Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशशर्जील जर राष्ट्रविरोधी असेल तर ते सिद्ध करा : कन्हैय्या कुमार

शर्जील जर राष्ट्रविरोधी असेल तर ते सिद्ध करा : कन्हैय्या कुमार

Sharjeel Imam Kanhaiya Kumar,Sharjeel Imam, Kanhaiya Kumar,Sharjeel, Imam, Kanhaiya, Kumarपाटणा : राष्ट्रदोहाचा देशात चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये. आज अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शर्जील जर राष्ट्रविरोधी असेल तर ते सिद्ध करा. माझ्यावरही राष्ट्रदोहाचा गुन्हा लावण्यात आला होता, असं कन्हैया कुमार म्हणाला.

नागरिकत्व कायद्याविरुद्ध (CAA) शाहीन बाग येथे प्रक्षोभक भाषणाच्या आरोपप्रकरणी जेएनयू विद्यार्थी नेता शर्जील इमामला अटक करण्यात आली आहे. शर्जील विरुद्ध राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर राष्ट्रदोह लावणे चुकीचे आहे, असे मत जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैया कुमार याने व्यक्त केले आहे.

कन्हैया कुमारने म्हणाला की, उद्यापासून ‘संविधान वाचवा – नागरिकत्व वाचवा’ यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा मोतीहारी बापूधाम येथून सुरू होणार आहे. तर २९ फेब्रुवारी रोजी पाटणाच्या गांधी मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे. या दिवशी गांधी मैदानात CAA, NRC आणि NPR विरोधात महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांना ‘फक्त रोजगार पाहिजे’, अशी घोषणा यावेळी करण्यात येणार आहे.

देशात NRC आणि CAA लागू होऊ देणार नाही…

देशाचे संविधान वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत देशात NRC आणि CAA लागू होऊ देणार नाही, असेही कन्हैया कुमार म्हणाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही कन्हैया कुमारने यावेळी टीका केली. नितीश कुमार यांचे एनआरसीवर जर वेगळे मत आहे तर ते विधानसभेत यासंबंधी ठराव मंजूर का करीत नाहीत. केरळप्रमाणे ठराव मंजुर केला तर त्याचे महत्व राहिल. केवळ बोलून काम चालणार नाही. आम्ही कुणाला नागरिकत्व देण्याच्या विरोधात नाही. परंतु, हे षडयंत्र आहे, हे नक्की. सीएएची भारताला गरज नाही. ही एनपीआर आणि एनआरसीचे पहिले पाऊल आहे. एनपीआर घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी नव्हे तर गरीब लोकांचे अधिकार हिसकावण्यासाठी आहे, असेही कन्हैया कुमार यावेळी म्हणाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments