Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंच्या मुंबईतील दोन सभांकडे सत्ताधा-यांच्या नजरा!

राज ठाकरेंच्या मुंबईतील दोन सभांकडे सत्ताधा-यांच्या नजरा!

raj thackeray rally mumbai assembly election 2019

लोकसभा निवडणुकीत भर सभेमध्ये व्हिडिओ दाखवून राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या आश्वासनांची पोलखोल केली होती. आज विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राज यांच्या दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

पावसामुळे पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर आज गुरूवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईत दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेद्वारे राज ठाकरे विधानसभा निवडणुक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता पहिली सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि दुसरी सभा गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आली आहे.

राज ठाकरे आज काय बोलणार ? त्यांच्या निशाण्यावर कोण असणार ? भाजप-शिवसेनेची कुठली प्रकरणे ते बाहेर काढणार ? याबद्दल राजकीय तज्ञांपासून सर्वांनाच उत्सुकता आहे. राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. राज ठाकरे सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. पण तिथे सुद्धा त्यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. नेते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

मुंबई, पुणे, नाशिक या शहरी भागात मनसेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे मनसेने उमेदवारी देताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळ मनसेचे उमेदवार रिंगणात उतरले नव्हते. पण राज ठाकरे यांची प्रत्येक सभा गाजली होती. भर सभेमध्ये व्हिडिओ दाखवून राज ठाकरे मोदी सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करत होते. आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments