Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदीनंतर 'MAN VS WILD' मध्ये झळकणार 'हा' अभिनेता

पंतप्रधान मोदीनंतर ‘MAN VS WILD’ मध्ये झळकणार ‘हा’ अभिनेता

Rajinikanth to feature in an episode of 'Man Vs Wild' with Bear Gryllsकर्नाटक : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत बेयर ग्रिल्सच्या ‘मॅन vs वाइल्ड’ या टीव्हीशोमध्ये दिसणार आहे. कर्नाटकच्या बांदीपूर संरक्षित वनक्षेत्रात या शोचे शूटिंग सुरू झाले आहे. पुढील तीन दिवस शूटिंग चालणार आहे. रजनीकांत आणि बेयर ग्रिल्स बांदीपूरमधील वनसंपदा आणि तेथील निसर्गाबद्दल चर्चा करतील.

बेअर ग्रिल्स सोमवारी रात्री 9.30 वाजता गंडलूपेट गावात पोहोचला. रजनीकांत बांदीपुरच्या बाहेरील रिसॉर्टमध्ये थांबले होते व आज सकाळी ते शूटिंगच्या ठिकाणी पोहचले. बेअर ग्रिल्ससोबत त्याची 18 जणांची टीम आहे. त्याचबरोबर वनविभागाने सर्व लोकांसाठी ठराविक वाहने दिली आहेत.

बांदीपुरा राष्ट्रीय उद्यान (कर्नाटक)

बांदीपुरा राष्ट्रीय उद्यान हे 1974 मध्ये स्थापन केले गेले. बांदीपूर उद्यान हे अंदाजे 874.2 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. ते चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलूपेट तालुक्यात आहे. म्हैसूर शहरापासून ते 80 किलोमीटर अंतरावर आहे. सुरुवातीला हि जागा म्हैसूरच्या राजाच्या खासगी शिकारीसाठीची होती. कालांतराने या जागेला बांदीपुरा व्याघ्र प्रकल्पात रुपांतरीत केले गेले.

Narendra Modi to feature in an episode of 'Man Vs Wild' with Bear Grylls

पीएम मोदी आणि ‘मॅन vs वाइल्ड’

पीएम नरेंद्र मोदी 12 ऑगस्ट 2019 रोजी बेयर ग्रिल्सच्या प्रसिद्ध ‘मॅन vs वाइल्ड’ या शोमध्ये झळकले होते. पीएम मोदीबरोबर ‘मॅन vs वाइल्ड’ या भागाचे चित्रीकरण उत्तराखंडच्या जिम कार्बेटच्या जंगलात करण्यात आले होते. हा कार्यक्रम जगातील सर्वात ट्रेंडिंग टेलिव्हिजन कार्यक्रम ठरला होता. या शो दरम्यान ग्रिल्स आणि पीएम मोदी यांच्यात अनेक मनोरंजक किस्से शेअर करण्यात आले होते. आत्ता सुपरस्टार रजनीकांत या शोमधून झळकणार आहे या निमित्ताने चाहत्यांमध्ये उसुक्ता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments