Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशबलात्कारी कुलदीप सेंगरची आमदारकी रद्द!

बलात्कारी कुलदीप सेंगरची आमदारकी रद्द!

Kuldeep Singh Sengar,Unnao,Kuldeep Sengar,Sengar,Kuldeepउन्नाव : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. कुलदीप सेंगर असं आरोपीचं नाव असून, बलात्कार प्रकरणात पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर भाजपानं त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. सेंगर यांची आमदारकी रद्द केल्याची अधिसूचना आज काढण्यात आली आहे.

अपहरण करुन केला होता बलात्कार…

कुलदीप सेंगर याने एका तरुणीचं अपहरण करून उन्नाव येथे बलात्कार केला होता. अत्याचाराची घटना घडली. ४ जून २०१७ रोजी घडलेल्या या घटनेवेळी पीडिता अल्पवयीन होती. याप्रकरणी पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पीडितेसह तिच्या कुटुंबीयांवर आरोपीकडून दबाव आणण्यात आला. तिच्या वडिलांचा कोठडीतच मृत्यू झाल्यानंतर पीडितेवरही प्राणघातक हल्ले करण्यात आले. कार अपघातात तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला होता. तर पीडिता गंभीर जखमी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात पीडितेनं सरन्यायाधीशांना पत्र लिहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेत लखनऊ पोलिसांना फैलावर घेतले होते. तसेच तातडीनं सुनावणी घेण्याचे आदेश दिल्लीतील तीसहजारी न्यायालयाला दिले होते. यासंपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

विधानसभेच्या मुख्य सचिवांनी आमदारकी रद्द केल्याची केली घोषणा…

न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभेनं कुलदीप सेंगरची आमदारकी रद्द केली आहे. याविषयीची अधिसूचना विधानसभेचे मुख्य सचिव प्रदीप कुमार दुबे यांनी जारी केली आहे. “कुलदीप सेंगर उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. दिल्लीतील एका न्यायालयानं त्यांना २० डिसेंबर २०१९ रोजी उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे १० जुलै २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या एका आदेशाप्रमाणे कुलदीप सेंगर यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झाली आहे,” असं अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments