Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर आज मातोश्रीवर कायं घडलं

राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर आज मातोश्रीवर कायं घडलं

Abdul Sattar

मुंबई : औरंगाबाद जिपच्या निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारला होता. त्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार उपनेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांच्यावर सडकून टीका केली होती. या सर्व वादानंतर आज (रविवार ५ जानेवारी  ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतली. भेटीदरम्यान संपूर्ण प्रकरणाची व माझ्या राजीनाम्याची पूडी कुणी सोडली याबद्द मी सविस्तर माहिती उध्दव ठाकरेंना दिली. अशी माहिती  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यमंत्री सत्तार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. मी नाराज नाही. काम करत राहणार असं सत्तार यांनी उध्दव ठाकरे यांनी सांगितले. तसेच सोमवारी सायंकाळी ५ : ३० वाजता पुन्हा राज्यमंत्री सत्तार यांच्यासोबत चर्चा होणार आहे. यामुळे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद जि.प.मध्ये शनिवारी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात राज्यमंत्री सत्तार यांनी शिवसेनेच्या विद्यान जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांना पुन्हा मैदानात उतरवले होते. भाजप व सत्तार समर्थकांच्या भरवशावर वाद निर्माण झाला होता.  काँग्रेसच्या मिना शेळके व शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी ३० मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली होती. यात काँग्रेसच्या शेळके विजयी ठरल्या. उपाध्यक्षासाठी भाजपचे लहानू गायकवाड व शिवसेनेच्या शुभांगी काजे यांच्यातील लढतीत महाविकास आघाडीची दोन मते फुटल्याने भाजपचा विजय झाला. यामुळे शिवसेनेचे माजी खासदार यांनी राज्यमंत्री सत्तार हे गद्दार आहेत. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही. असं विधान केलं होतं. त्यामुळे शिवसेनेमध्ये दुफळी असल्याचे समोर आले होते.

त्यानंतर राज्यमंत्री सत्तार यांनी माझं रिमोट कंट्रोल मातोश्रीवर आहे. त्यामुळे मला काय बोलायचं मी मातोश्रीवर बोलणार असं सांगितलं होतं. आज रविवारी ते मातोश्रीवर पोहोचले असून काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments