Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशधक्कादायक : दिल्लीत दंगलखोरांचा आई- मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

धक्कादायक : दिल्लीत दंगलखोरांचा आई- मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

मुलींसह महिलेनं पहिल्या मजल्यावरून घेतली उडी

Woman Gang-Raped, Husband, 2 Others Arrested In Mumbaiनवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आता एकामागून एक घटना समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान, या हिंसाचारादरम्यान दोन मुलींसह पहिल्या मजल्यावरून जीव वाचवून पळालेल्या महिलेनं आपली आपबीती सांगितली. जाळपोळ करणारा जमाव घरात घुसला. जमावानं मला आणि माझ्या मुलींना छेडायला सुरूवात केली. त्यानी कपडेही फाडले. त्यामुळे मी आणि मुलींनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचवला. अशी माहिती पीडित महिलेने दिली.

दिल्ली हत्याकांडामध्ये आतापर्यंत ४९ नागरिकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी ईशान्य दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थक यांच्यात यांच्यात तुफानी दगडफेक झाली. यावेळी दोन्ही गटातील जमावानं घरं, दुकानं, वाहनं यांना लक्ष्य करत जाळपोळ केली. तसेच नागरिकांवरही हल्ले केले. यात अनेकांना जीव गमवावा लागला. जाफराबाद, यमुना विहार, बाबरपूर, खजुरी खास या भागात झालेल्या हिंसाचारातील मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे ज्या भागांमध्ये भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्या भागात दंगली घडल्या आहेत.

पीडित महिलेने सांगितली आपबिती…

४५ वर्षीय पीडित महिला उत्तर पूर्व दिल्लीतल्या अल हिंद रुग्णालयात उपचार घेत आहे. पीडित महिलेने हिंसाचारादरम्यान घडलेली आपबिती सांगितली. “हिंसक घटना घडत असताना मी घरीच होते. अचानक जाळपोळ करणारा जमाव घरात घुसला. जमावानं मला आणि माझ्या मुलींना छेडायला सुरूवात केली. त्यानी कपडेही फाडले. त्यामुळे मी आणि मुलींनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचवला. उड्या मारल्यानंतरही जमाव आमच्यामागे लागला होता. पण, मी एक जवळच असलेल्या दुकानदाराकडे मदत मागितली. दुकानदार अय्युब अहमद यांनी आमची मदत केली.

दंगलखोर छेड काढणा-यांना मी ओळखू शकते…

जे दंगलखोर आमच्या घरात घुसले होते त्यांना मी ओळखते, कारण ते सगळे आमच्याच गल्लीत राहणारे आहेत, असं सांगताना ४५ वर्षीय महिलेला गहिवरून आलं. सध्या पीडित महिलेवर, तिच्या मुलीवर उपचार सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments