Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या२००० ची नोट बंद होणार नाही; सरकारचे स्पष्टीकरण

२००० ची नोट बंद होणार नाही; सरकारचे स्पष्टीकरण

Rs 2000 Note will not close; Government Explanation Anurag Thakurनवी दिल्ली : २००० ची नोट चलनातून बंद होणार अशा बातम्या येत होत्या. तसेच सोशल मीडियावर काही मॅसेजेस फिरत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर केंद्र सरकराने स्पष्टीकरण दिले, २००० ची नोट रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. ही अफवा होती हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, समाजवादी पार्टीचे खासदार विश्वंभर प्रसाद निशाद यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. २००० ची नोट चलनात दाखल झाल्यामुळे काळ्या पैशाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार ही नोट रद्द करुन पुन्हा १००० ची नोट चलनात आणत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरु आहे, असे निशाद यांनी म्हटले होते. यावर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिले.

२००० ची नोट रद्द होणार नाही…

केंद्रिय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. २००० ची नोट रद्द होणार नाही त्यामुळे कुठलीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments