Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशसपना चौधरी म्हणाली, ‘’कमळाचे बटन दाबून कोणाला विजयी करायचे?’’ उत्तर मिळाले केजरीवालांना!

सपना चौधरी म्हणाली, ‘’कमळाचे बटन दाबून कोणाला विजयी करायचे?’’ उत्तर मिळाले केजरीवालांना!

Sapna Chaudhary Arvind Kejriwal,Sapna Chaudhary, Arvind Kejriwal,Sapna, Chaudhary, Arvind, Kejriwal

नवी दिल्ली : दिल्ली काबीज करण्यासाठी ‘आप’सह भाजप आणि काँग्रेसने जोर लावला आहे. मतदानाला अवघे ३४ तास उरले आहेत. त्यामुळे जोरदार प्रचारसभा सुरु आहे. परंतु भाजपच्या प्रचारसभेत भलतचं काही घडलं. भाजपच्या कार्यकर्त्या नृत्यांगणा सपना चौधरी हिने भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मतदारांना विचारलं कोणाला विजयी करायचे आहे, त्यावर उपस्थित लोक म्हणाले, “केजरीवाल”. “तोच प्रश्न तिने पुन्हा विचारला असता तेच उत्तर मतदारांकडून मिळाले यामुळे सपना चौधरीला व उपस्थित भाजप नेत्यांना धक्का बसला.

दिल्लीत ८ फेब्रुवारी ७० जागांसाठी मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी निकाल जाहील होईल. त्यासाठी भाजपचे सर्व खासदार, मंत्री, इतर राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री दिल्लीत कामाला लावले आहेत. भाजपचे नेते, मंत्री भडक भाषणबाजी करुन प्रचार करत आहेत. दिल्ली घोंडा विधानसभा मतदारसंघात सपना चौधरी भाजप उमेदवाराचा प्रचार करताना तिने सभाही घेतली. या सभेत ती भाषण करण्यास उभी राहिली. ती म्हणाली आजही भाजप एक नंबरवरच राहिल. तर कमळाचे बटन दाबा आणि कोणाला विजयी करायचे आहे माहित आहे का? या प्रश्नावर लोक म्हणाले ‘’केजरीवालांना’’

लोकांच्या उत्तराने सपना चौधरी अवाक् झाली. त्यामुळे तीने हा प्रश्न पुन्हा विचारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments