Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशशाहीन बाग : सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थिंनी घेतली निदर्शकांची भेट

शाहीन बाग : सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थिंनी घेतली निदर्शकांची भेट

Shaheen Bagh Protest Supreme Court,Shaheen Bagh Protest, Supreme Court,Shaheen Bagh, Supreme, Courtनवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून CAA आणि NRC विरोधात दिल्लीत शाहिन बागमध्ये आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियु्क्त केलेल्या मध्यस्थांनी बुधवारी दुपारी शाहीन बागेतील निदर्शकांची भेट घेतली. वार्ताकार अॅड. संजय हेगडे आणि अॅड. साधना रामचंद्रन यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचे वाचन केले.

अॅड. साधना रामचंद्रन म्हणाल्या की ज्या प्रकारे तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्याच प्रकारे इतरांनाही रस्त्यावर चालण्याचा आणि दुकाने उघडण्याचा अधिकार आहे. मध्यस्थिंनी निदर्शकांसोबत बोलण्यापूर्वी मीडियाला तेथून जाण्याची विनंती केली. निषेधामुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेला रस्ता रिकामा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आंदोलकांशी बोलणी करण्यासाठी मध्यस्थांची नेमणूक केली होती.

शाहीन बागमध्ये लोकांना संबोधित करताना साधना रामचंद्रन म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र आमच्यासारखे इतरही नागरिक आहेत, जे या रस्त्यावरून ये-जा करताता. मुले शाळेत जातात, लोक कचेरीत जातात. त्यांचे देखील अधिकार आहेत. अधिकार तोपर्यंतच असावा जोपर्यंत दुसऱ्यांचा अधिकारावर परिणाम होणार नाही. रस्ते, पार्क, पूल सार्वजनिक सुविधा आहेत. आम्ही तुमचे म्हणणे ऐकू. मला विश्वास आहे की, आम्ही असा काही तोडगा काढू जो देशासाठी नाही तर विश्वासाठी एक आदर्श बनेल. त्यांनी म्हटले की, आम्ही माध्यमांशिवाय निदर्शकांशी चर्चा करू. आपल्या चर्चेची माहिती माध्यमांना नंतर दिली जाईल.

शाहीन बागेत गेल्यानंतर हेगडे म्हणाले की, आम्हाला येथे येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता. आम्ही सर्वांशी चर्चा करून आणि सर्वांच्या सहयोगाने आम्ही या मुद्दा सोडवू अशी आशा आहे. आम्ही दोघे सर्वोच्च न्यायालयातील वकील आहोत, आम्ही सर्वांचे म्हणणे ऐकू. शाहीन बागेत जाण्यापूर्वी हेगडे यांनी ट्विटरवर लोकांकडून गतिरोध संपवण्यासाठी सूचना मागवल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments