Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज्यसभा : शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, फौजीया खान वेटींगवर!

राज्यसभा : शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, फौजीया खान वेटींगवर!

Sharad Pawar Rajya Sabha,Sharad Pawar, Rajya Sabha,Sharad, Pawar, Rajya, Sabhaमुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थितीत पवारांनी अर्ज भरला. मात्र काँग्रेस चौथ्या जागेसाठी अजूनही आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान तूर्तास तरी वेटींगवर आहेत.

राज्यसभेच्या चौथ्या जागेबाबत समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेस राज्यसभेतील महाराष्ट्र विकास आघाडीच्या चौथ्या जागेसाठी आग्रही असल्यामुळे बैठकीत यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यासोबतच शिवसेनेच्या उमेदवाराचा सस्पेन्सही कायम आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार १३ मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं बोललं जात होतं.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली असून आज भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची घोषणाही आज होणार आहे. भाजपकडून एकनाथ खडसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित मानलं जात असलं, तरी अधिकृत उमेदवारांची नावं गुलदस्त्यातच आहेत. दरम्यान, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले उद्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. विधानभवनात जाऊन आठवले अर्ज दाखल करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments