Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअमित शाहा जेलवारी केलेले गृहस्थ; शरद पवारांचा घणाघात

अमित शाहा जेलवारी केलेले गृहस्थ; शरद पवारांचा घणाघात

sharad pawar on amit shah shirur
“गुजरातचे एक भले मोठे गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव आहे ” असा घणाघात शरद पवारांनी अमित शाहांवर केला.

विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून कलम ३७०चा वारंवार पुर्नउल्लेख केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शरद पवार हे कलम ३७०च्या विरोधात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे त्यांच्या सभेत यावरून शरद पवारांवर टीका करत असून, त्याला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

शिरूर येथे झालेल्या प्रचार सभेत शरद पवार म्हणाले, ”हे गृहस्थ मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात माझ्याबद्दल काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? मग जाब कसला विचारता? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून कलम ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे,” असं पवार यांनी सांगितलं.

शाह यांना उत्तर देताना पवार म्हणाले,”निवडणुकांच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. गुजरातचे एक भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नसतानाही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव… निवडणूक शरद पवार या एका नावावरच ते लढवत आहेत,”असा टोला पवार यांनी लगावला.

महागाईवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला…

“गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथलं घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार आहे का शेती करायला? हे मुद्द्याचे बोलतच नाहीत.. महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला की..,” असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

आघाडी सरकार असताना शिरूर भागात कारखानदारी आणली हे काही फडणवीस सरकारच्या काळात झालेले काम नाही. मात्र आज अवस्था काय आहे ? पिंपरी-चिंचवड येथे तरूणांना नोकऱ्यांवरून काढून टाकत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. परिस्थिती हाताळण्याची क्षमता यांच्यात नाही. असा शरद पवारांनी घणाघात केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments