Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेला पंधरा, तर भाजपला चार जिल्ह्यात नो एंट्री !

शिवसेनेला पंधरा, तर भाजपला चार जिल्ह्यात नो एंट्री !

shiv sena fifteen and bjp has no entry in four districts
युती सरकारने पाच वर्षात राज्यावर कर्जाचा डोंगर उभा केला. विकासात्मक कामे केली नाही. त्यामुळे युती असूनही दोन्ही पक्षांच्या जागा घटल्या. शिवसेनेला तब्बल पंधरा, तर भाजपला चार जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे त्या जिल्ह्यातील मतदारांनी या दोन्ही पक्षांना नो एंट्री असल्याचे दाखवून दिले.

भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांना फटका बसला आहे. पालघर, भंडारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. भाजपवर तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच हद्दपार होण्याची नामुष्की ओढवली आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या भाजपच्या हातात असलेल्या दोन्ही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या.

भंडाऱ्यात भाजपचे तीन आमदार होते. भाजपने तिन्ही विद्यमान आमदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मात्र भाजपला तिन्ही जागा गमवाव्या लागल्या आहेत. परिणय फुकेंनाही हायप्रोफाईल लढतीत काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून पराभव स्वीकारावा लागला.

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने तीन जागा टिकवल्या आहेत. मात्र माकप आणि राष्ट्रवादीने भाजपच्या दोन्ही जागा खेचून आणत पालघरातून भाजपचं संस्थान खालसा केलं आहे. रत्नागिरीत भाजपने एकही जागा लढवलेली नव्हती.

अमरावतीत भाजप चार जागांवरुन एकावर घसरली आहे, तर गोंदियात तीन जागांवरुन भाजपची एकावर घसरण झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या तीन जागांपैकी एक जागा भाजपच्या हातून निसटली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात भाजप चारवरुन निम्म्या जागांवर आली.

नांदेडमध्ये भाजपकडे एक जागा होती, ती वाढून दोनावर गेली आहे. मात्र विधानसभेच्या नऊ जागा असलेल्या नांदेडमध्ये भाजपचा खासदार असूनही दोन जागांवरच भाजपला समाधान मानावा लागला. परभणीत भाजपने खातं उघडत एक जागा मिळवली, ती रासपमधून आलेल्या मेघना बोर्डीकरांच्या जोरावर. तर हिंगोलीतही भाजपला एकच जागा मिळाली आहे.

अहमदनगरमध्ये विखे पाटील पिता-पुत्रांनी बाराही जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला होता. मात्र राष्ट्रवादीने त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदेंना पराभवाची धूळ चारलीच, सोबत भाजपला पाच जागांवरुन तीनावर आणून ठेवलं.

बीड आणि सांगलीमध्येही भाजप चार जागांवरुन दोनावर आली आहे, तर लातूरमध्ये भाजपच्या वाट्याला दोनच जागा आल्या आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबादमध्ये भाजपने अनुक्रमे एक, एक आणि दोन जागा मिळवत खातं उघडलं तेही चार आयाराम आमदारांच्या बळावर.

शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. शिवसेनेला विदर्भात मोठं फटका बसला. वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या विदर्भातील आठ राज्यांमध्ये एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. बुलडाण्यात दोन तर यवतमाळ-अकोल्यात सेनेचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला आहे. म्हणजेच विधानसभेच्या 62 जागा असलेल्या 11 मतदारसंघात सेनेचे केवळ 4 आमदार आहेत.

विदर्भातील आठ राज्यात नंदुरबार, धुळे, जालना, अहमदनगर, पुणे, बीड, लातूर या सात, मतदारसंघात एकूण 15 जिल्ह्यांत शिवसेनेला खातं उघडता आलेलं नाही. नांदेड, हिंगोली, परभणी, पालघर, सांगलीमध्ये प्रत्येकी एक, तर नाशिक-साताऱ्यामध्ये प्रत्येकी दोनच जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत.

औरंगाबादमध्ये मात्र नऊपैकी सहा जागी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. मुंबई (13) आणि ठाणे (05) नंतर औरंगाबादेतच शिवसेनेने चांगली कामगिरी बजावली आहे.

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला 21 पैकी केवळ सहा जागाच युतीकडून सोडण्यात आल्या होत्या. परंतु शिवसेनेला पुण्यात भोपळाही फोडता आलेला नाही. दोन खासदार आणि सहा आमदार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही कशीबशी एक जागा टिकवून ठेवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि रत्नागिरीत मिळून शिवसेनेचे निम्मे आमदार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments