Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्रीपदी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची वर्णी?

मुख्यमंत्रीपदी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची वर्णी?

Shiv Sena's Eknath Shinde likely to be Chief Minister
मुंबई : शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची पाच वर्ष जबाबदारी दिली जाणार आहे. आधी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली होती. मात्र शिवसेनेकडून ज्येष्ठ शिवसैनिक आमदार एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील व्यक्तीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे, राज्यसभा खासदार अनिल देसाई, विधानपरिषदेचे आमदार सुभाष देसाई यांचीही नावं चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’मध्ये सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची आज 4 वाजता बैठक आहे. सगळं ठरलं की दोन दिवसांत राज्यपालंकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करु. ते लक्ष देतील ही अपेक्षा आहे. असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करतील. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडणार आहे. महाविकासआघाडी शनिवार 23 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments