Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअमित शाह तुम्ही बाळासाहेबांच्या मंदिराचा अपमान केला : संजय राऊत

अमित शाह तुम्ही बाळासाहेबांच्या मंदिराचा अपमान केला : संजय राऊत

shivsena sanjay raut lashes bjp president amit shah over power sharing
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या खोलीत बसत होते ती तुमच्यासाठी खोली आहे, ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. अमित शाह तुम्ही बाळासाहेबांचा आणि त्या मंदिराचा अपमान केला. असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गरुवारी पत्रकार परिषदेत केला.

बंद खोलीतील चर्चा सार्वजनीक करता येत नाहीत असं भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी सांगितलं होतं. आज गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्या वक्तव्याचा समाचार घेतला.

बंद दरवाज्याआज जी काही बोलणी झाली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का सांगितली नाही, असा सवालही राऊत यांनी यावेळी केला. निवडणुकीदरम्यान आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली. त्यामुळे निवडणुकीदरम्यान ठरवलेल्या गोष्टी त्यांना कळणं अपेक्षित होतं. आमचा त्यांच्याप्रती आदर आहे. बंद खोलीत ज्या गोष्टी ठरतात, त्यावर जेव्हा अंमल होत नाही त्यावेळी त्या बाहेर येतात, असंही ते म्हणाले.

शाह बुधवारी म्हणाले होते. जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करत होतो, तेव्हा शिवसेनेनं आक्षेप का घेतला नाही, असं शाह म्हणाले होते. राऊत म्हणाले, आम्ही पंतप्रधानांचा आदर करतो आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्हाला ते करायचं नव्हतं. भाजपाला जरी त्यांचा आदर नसला तरी आम्ही त्यांचा आदर करतो. म्हणून आम्ही त्यावेळी त्यावर काही आक्षेप घेतला नाही. बंद दाराआडच्या चर्चा योग्य वेळी मोदींपर्यंत पोहोचल्या नाहीत. युती कोणत्या कारणामुळे झाली हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडण्याची इच्छा नाही, असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बंद खोलीतील विषय सामान्य नव्हता. महाराष्ट्रातील स्वाभिमाना आणि नेतृत्वाचा होता. सेनेनं राजकारणात नफा तोटा पाहिला नाही. असंही राऊत यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments