Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशहा नवा भारत जिथं गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातोय - ओवेसी

हा नवा भारत जिथं गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातोय – ओवेसी

Asaduddin Owaisiहैदराबाद : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणानंतर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीकास्त्र सोडलं. हा नवा भारत आहे जिथं गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातोय. अशी टीका करत केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.

यांना ट्रस्टमध्ये पद देण्यात आले…

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील आरोपी नृत्य गोपाल दास यांना अध्यक्ष आणि व्हीएचपीचे उपाध्यक्ष चंपत राय यांना केंद्र सरकारनं महासचिव पद दिलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आपला संताप व्यक्त केलाय. गुन्ह्यांत समाविष्ट असलेल्या व्यक्तींना पुरस्कार देणारा हा नवा भारत आहे, असं म्हणत ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

‘सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय देताना मशीद विध्वंस करण्याचं कृत्य लाजिरवाणं असल्याचं म्हटलं होतं. हा त्याचाच सिक्वल आहे. एक व्यक्ती जो बाबरी मशीद पाडण्याचा आरोपी आहे, त्याच व्यक्तीकडे सरकारनं राम मंदिर बनवण्याची जबाबदारी सोपवलीय. हा नवा भारत आहे जिथं गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातो’ असं ओवैसी यांनी म्हटलंय.

दीर्घ काळानंतर केंद्र सरकारनं अयोध्येचे सर्वात मोठा मठ असलेल्या मणिराम छावणीचे महंत नृत्य गोपाल दास यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा अध्यक्ष आणि व्हीएचपी उपाध्यक्ष चंपत राय यांना महासचिवपदी नेमलं आहे. महंत नृत्य गोपाल दास १९८४ पासून मंदिर आंदोलनाशी निगडीत आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली मंदिर कार्यशाळेत राम मंदिरासाठी दगड शोधण्याचं काम सुरू होतं. बाबरी विध्वंसानंतर सीबीआय कोर्टात दास आणि राय यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे.

यापूर्वी, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये महंत नृत्य गोपाल दास यांच्या नावाचा समावेश नसल्यानं दास यांच्या समर्थकांमध्ये नाराजी परसली होती. त्यानंतर स्वत: अमित शहा यांनी भेट घेऊन नाराजी दूर करण्याचं आश्वासन महंतांना दिलं होतं.

चंपत राय कोण आहेत…

तर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या करिअरची सुरुवात भौतिक विज्ञान प्रवक्ता म्हणून केली होती. बिजनौरच्या एका महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते संघाशी जोडले गेले आणि प्रचारकाची जबाबदारी त्यांनी पेलली. १९८४ पासून व्हीएचपीचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल यांचे प्रमुख सहकारी म्हणून ते मंदिर आंदोलनाशी जोडले गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments