Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्रिपदासाठी 'उद्धव ठाकरें'च्या नावावर एकमत : शरद पवार

मुख्यमंत्रिपदासाठी ‘उद्धव ठाकरें’च्या नावावर एकमत : शरद पवार

uddhav thackeray as chief minister insist sharad pawar
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची सर्व संमती झाली असून उद्या संयुक्त पत्रकार घेऊन तसं जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहरु सेंटरमध्ये झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

आज तिन्ही पक्षांची मॅरेथान बैठक वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे इतर नेत्यामंध्ये नेहरू सेंटरमध्ये बैठक झाली. त्यामुळे उद्या महाविकास आघाडी सत्तास्थापन करण्याचा दावा करण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments