Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउध्दव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार!

उध्दव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार!

Chief Minister Uddhav Thackeray today at Fort Shivneriमुंबई : मी कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी निवडणुक लढवेन असं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उध्दव ठाकरे विधानसभा लढणार की विधानपरिषद लढणार याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, उध्दव ठाकरेंच्या स्पष्टीकरणानंतर ती उत्सुकता आता संपली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत त्यांनी मी कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी निवडणुक लढवेन असं सांगितलं आहे. पण नेमक्या कोणत्या जागेवर उद्धव ठाकरे लढणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या दोन ते तीन महिन्यात विधान परिषद सदस्य होण्यासाठी निवडणुक लढवणार हे आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री पदावर असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषद यांच्या पैकी एका सभागृहाचं सदस्य बननं आवश्यक आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या मुदतीपुर्वी त्यांना आता विधान परिषद सदस्य बननं आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments