Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराम नाईकांसह उज्ज्वल निकम, तेंडूलकर यांच्या सुरक्षेत घट; आदित्य ठाकरेंना झेड सुरक्षा

राम नाईकांसह उज्ज्वल निकम, तेंडूलकर यांच्या सुरक्षेत घट; आदित्य ठाकरेंना झेड सुरक्षा

Ujjwal Nikam-Ram Naik-Sachin Tendulkar-Aaditya Thackeray,Ujjwal,Nikam,Ram,Naik,Sachin, Tendulkar,Aaditya, Thackeray

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून नुकतेच राज्यातील ४५ महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहे. माजी राज्यपाल राम नाईक, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची झेड प्लस सुरक्षा कमी करण्यात आली. नाईक यांना ‘एक्स’ दर्जाची तर निकम यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा करण्यात आली आहे. तर युवा सेना प्रमुख शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करुन त्यांच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेचा दर्जा ‘झेड’ सुरक्षेत करण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून नुकतेच राज्यातील ४५ महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत बदल करण्यात आले. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याही सुरक्षेत घट करण्यात आली आहे. निकम यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था ‘वाय’ दर्जाची करण्यात आलीय. तर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून ती ‘वाय प्लस’वरुन ‘झेड’ दर्जाची करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा कमी करुन ‘एक्स’ दर्जाची करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरला याआधी एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. म्हणजेच सचिनसोबत चोवीस तास पोलीस कॉन्स्टेबल असायचा. पण आता अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. यापुढे सचिनला पोलिस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना यापूर्वी वाय दर्जाच्या सुरक्षेसोबतच एस्कॉर्ट सुरक्षा देखील होती. आता खडसेंची एस्कर्ट सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘झेड प्लस’ सुरक्षेत बदल करण्यात आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची ‘झेड’ सुरक्षा कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments