Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबापरे ! आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

बापरे ! आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Nadine Dorries,Nadine, Dorriesलंडन : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने ब्रिटनमध्ये एन्ट्री घेतली आहे.  ब्रिटनच्या आरोग्य मंत्री नदीन डॉरिस यांनाही करोनाची बाधा झाली आहे. डॉरिस यांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.

करोनाच्या उपाययोजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेणारे आरोग्य मंत्र्यांनाच बाधा झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डॉरिस यांनी स्वत: ला एका खोलीत बंद केले आहे. करोनाचा संसर्ग ब्रिटनमध्ये फैलावू नये यासाठी सरकारकडून उपाय योजना आखल्या जात आहेत. विशेष म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून त्या सक्रिय आहेत. त्यांच्यासोबत त्यांची ८४ वर्षीय आई वास्तव्यास आहे. त्यांनाही मंगळवारपासून खोकल्याचा त्रास होत असल्याचे डॉरिस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आईची उद्या वैद्यकीय चाचणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये ३८२ जणांना करोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत २६ हजारहून अधिकजणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. लंडनमध्ये करोनाचे ९१ रुग्ण आढळले आहेत. चीननंतर इटली व इराणमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. इराणच्या उपराष्ट्रपती, आरोग्यमंत्र्यांसह जवळपास २३ खासदारांनाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. जगभरातील सुमारे १०० देशात फैलावलेल्या करोना संसर्गाची अनेकांना बाधा झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments