Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनाखूश खडसे अखेर शिवबंधनात अडकणार

नाखूश खडसे अखेर शिवबंधनात अडकणार

Eknath Khadse - Uddhav Thackeray

मुंबई : भाजपचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास निश्चित आहे. माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन या दोघांनी माझा तिकीट कापला असा खळबळजनक गौप्यस्फोट खडसे यांनी नुकताच केला. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुध्दा खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे विधान केल्यामुळे खडसे यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.

एकनाथ खडसे यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलताना दावा केला की, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत माझ्याबाबत फडणवीस आणि महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे माझा तिकीट कापण्यात आला. खडसेंचा तिकीट कापून त्यांची कन्या रोहिणी खडसेंना तिकीट देण्यात आले होते. मात्र, रोहिनी खडसेंचाही पराभव झाला होता. कन्येच्या पराभवानंतर खडसेंनी भाजपच्या लोकांनीच विरोधात काम केले असा आरोप केला होता. त्याचे पुरावे दिल्लीदरबारी दिले होते. त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. खडसेंनाही दिल्ली दरबारी बोलावून त्यांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेण्यात आले होते. मात्र अद्यापही भाजपमध्ये कुणावर काही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे या दरम्यान, खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती.

नाराज खडसे यांनी १२ डिसेंबर रोजीही दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात भाजपवर जोरदार टीका केली होती. मी भाजपमध्ये राहणार की नाही याचा काही भरवसा नाही असं विधान केलं होतं. अखेर नाराज खडसे हे भाजपला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कॅबिनेट मंत्री गुलाबराब पाटील यांनीही खडसेंबद्दल जो दावा केला त्यामुळे खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments