Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईविजय वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे होते नाराज; आज स्वीकारला पदभार

विजय वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे होते नाराज; आज स्वीकारला पदभार

मुंबई : काँग्रेसच्या वाटेला आलेलं खातं शिवसेनेला देण्यात आलं त्यामुळे मी नाराज होतो. मी माझ्या काँग्रेस पक्षावर नाराज नव्हतो अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पदभार स्विकारतांना व्यक्त केली. आज शुक्रवार ( १० जानेवारी ) वडेट्टीवार यांनी पदभार स्वीकारला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली. त्यापूर्वी माणिकराव ठाकरे यांनी सुध्दा चर्चा केली होती. अखेर काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर वडेट्टीवारांची नाराजी दूर झाली. काँग्रेसच्या वाटेवर कृषी खाते आले होते. परंतु ते शिवसेनेला देण्यात आले.  त्या खात्याचा शेतक-यांना उपयोग होईल यासाठी तो खाता हवा होता. त्यामुळे मी नाराज होतो. मी माझ्या काँग्रेस पक्षावर नाराज नव्हतो असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेले कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर अपेक्षित खाते न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. या बरोबरच विस्तारानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून वडेट्टीवार आपली नाराजी व्यक्त करतील अशा बातम्याही सकाळपासूनच प्रसिद्ध झाल्या होत्या. वडेट्टीवार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह अधोरेखित झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विस्तारानंतर इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन खाते मिळालेले वडेट्टीवार नाराज होते. खातेवाटपानंतर ते प्रतिक्रिया देण्यासही तयार नव्हते. ‘आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून त्यांच्या नाराजीची तीव्रता स्पष्ट झाली होती.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. महत्त्वाचे पद असलेल्या वडेट्टीवारांचा सत्ताबदलानंतर काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीतही समावेश करण्यात आला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता वडेट्टीवार यांना नव्या सरकारमध्ये महत्त्वाचे खाते मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांना अपेक्षेनुसार खाते मिळाले नाही.

मंत्रिमडळ विस्तारानंतर (मंगळवार) पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला वडेट्टीवार हे हजर राहणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, विस्तारानंतरच्या पहिल्याच बैठकीला गैरहजर राहून वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन हे खाते देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments