Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्रालयात तरुणीचा 6 व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात तरुणीचा 6 व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न

Woman try to suicide in Mantralaya jumps from 6th floorमुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पहिल्या मजल्यावर जाळी लावली असल्याने या तरुणीचा जीव वाचला. प्रियंका गुप्ता असं या तरुणीचं नाव आहे.

प्रियंका गुप्ता या तरुणीला मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आहे. ही तरुणी उल्हासनगर येथील रहिवाशी आहे. मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तिची चौकशी सुरु आहे. मात्र, या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न का केला अद्यापही माहिती समोर आली नाही. दरम्यान मंत्रालयात याआधीही आत्महत्येचे प्रयत्न झाल्याने संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. आता या जाळीमुळेच आज उडी मारलेल्या तरुणीचाही जीव वाचला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments