ZP RESULT : नंदुरबार जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात

- Advertisement -

thackeray Government releases maharashtra vikas aghadi minister's portfolioनंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्यातील समिकरण बघता नंदूरबार जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडी करुन सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. येथे भाजपला धक्का बसला आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला २३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपही २३ जागांवर विजयी झाली आहे. त्यामुळे यात शिवसेनेला ७ जागा मिळाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी तीन जागांवर विजयी झाले आहेत.

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षातील घराणेशाही दिसून आली. त्यात भाजपा नेते विजयकुमार गावित यांच्या परिवारातील चार सदस्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय झाले. तर नवापूरमध्ये काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांचे दोन्ही बंधू जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवी या ही विजयी झाल्या  आहेत.

- Advertisement -

राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात के. सी. पाडवी हे व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात योग्य वेळ मिळालेला नाही. या कारणामुळे काँग्रेसला बहुमत आतापर्यंत पोहोचता आलं नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल…

काँग्रेस :   २३

भाजपा :  २३

शिवसेना :  ७

राष्ट्रवादी :

- Advertisement -