संविधानासाठी रस्त्यावर!

- Advertisement -

संविधानावरुन राजकारण आता रस्त्यावर होणार आहे. याचीच झलक म्हणून २६ जानेवारी रोजी विरोधकांकडून दिसून येणार आहे. खरतर संविधानावरुन राजकारण करणारे आणि वारंवार संविधान बदलण्याची भाषा करणारे केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा आणि त्यांच्या बगल बच्च्यांचा हा डाव आहे. हा प्रकार विरोधकांना कळाल्यामुळे सर्व विरोधकांनी वज्रमुठ बांधली. देशातले आणि राज्यातले सत्ताधारी संविधान बदलण्याच्या प्रयत्नात असून याविरोधात २६ जानेवारीला सर्वपक्षीय बचाओ रॅली निघणार. काँग्रेस पक्ष या रॅलीत सहभागी होणार असून त्याच दिवशी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संविधान बचाओ रॅली काढण्यात येणार. सर्वपक्षीय संविधान बचाओ रॅलीला उत्तर म्हणून भाजप तिरंगा रॅली काढणार. भाजपाची पितृ संस्था असणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने  देशाचा राष्ट्रध्वज तीन रंगाचा असणे अशुभ असे सांगून राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याचा  अवमान केला. संघमुख्यालयात अनेक वर्ष तिरंगा फडकावला ही नाही. तेच लोक तिरंगा रॅली काढतायेत हे हास्यापद आहे. परंतु तिरंगा रॅली काढल्याने मनातीलव्देष संपत असेल तर अशा रॅली दररोज काढा.एक दिवस रॅली काढून खोटी देशभक्ती काहीच कामाची नाही.आज ज्या पध्दतीने केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे मंत्री,त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी वारंवार संविधान बदलण्याची भाषा करत आहेत ती देशासाठी धोकादायक आहे. देशात समाजा समाजात दंगे भडकवून अराजकता निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु आहे. समाजात दंगली भडकवून राजकीय दुकानदारी चालविणाऱ्या राजकीय पक्षांनी खोटी देशभक्ती जाहीर करु नये. आज समाजा समाजामध्ये जातीयव्देष निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचे काम केंद्रातील सरकारचे मंत्री,कार्यकर्ते,पदाधिकारी आणि भाजपाशी संबिधत संघटना करत आहेत. मात्र अशा लोकांना आवरण्याचे धाडस त्यांचे वरिष्ठ करत नाही. कारण त्यांना वातावरण खराब करुन समाजात तेढ निर्माण करुन सत्तेचा मलिदा लाटायचा आहे. हेच राजकारण देशाचे तुकडे करण्यासाठी पुरेसे आहेत. देशाला एकसंघ ठेवण्यासाठी संविधानावर विश्वास असणे आवश्यक आहे. संविधान बदलण्याची भाषा देशतोडण्यासारखी आहे. ज्या पध्दतीने देशात परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला सरकारच जबाबदार आहे. विरोधक तिरंगा रॅली काढणार असल्यामुळे त्यांची मन बदलतील का हा खरा प्रश्न आहे. जो पर्यंत मन स्वच्छ आणि डोक्यातील व्देषाने भरलेले विचार जो पर्यंत निघणार नाही तो पर्यंत रैली काढून काहीही फायदा होणार नाही.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

- Advertisement -