Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखतलाकने ‘कमळाबाईचा’ थयथयाट!

तलाकने ‘कमळाबाईचा’ थयथयाट!

०१९ च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार अशी डरकाळी शिवसेनेने फोडत भाजपाला तलाक दिला. शिवसेनेच्या या तलाकने ‘कमळाबाई’चा थयथयाट झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना फोन केला. तर मुंबई अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी  लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपाही स्वबळावर लढवण्यात तयार असल्याचे सूतोवाच केलं. भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी लोकसभेला शिवसेनेचे केवळ ५ तर भाजपाचे २८ खासदार निवडून येतील अशी भविष्यवाणी केली. खरतर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कमळाबाईला तलाक देतील अस त्यांनी विचारही केला नसेल. खरतर आज शिवेसना पक्षप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांची जयंती होती. शिवसेना २०१९ च्या विधानसभा, लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या ठरावाला कार्यकारिणीत मंजुरी मिळाली आहे. वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर हा ठराव मांडण्यात आला. यावेळी एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. यापूर्वी मुंबई महापालिका निवडणूकीच्या वेळी उध्दव ठाकरे यांनी युतीमध्ये शिवसेना २५ वर्ष नासली असे विधान करत युती तुटल्याची घोषणा केली होती. यानंतर भाजपासोबत कधीही युती करणार नाही असे जाहीर केले होते. तेव्हा पासून शिवसेना भाजपाचे संबंध जास्तच ताणले होते. या दोन्ही पक्षांची युती जरी होती तरी त्यांचा वाद सुरुच होता. परंतु ज्या शिवसेनेमुळे भाजपाला राज्यात आपलं बस्तान बसवता आलं. तीच भाजपा आज शिवसेनेकडे डोळे वटारुन पहात असल्यामुळे वाद चांगला उफाळला आहे. दोन्ही पक्ष राज्यात,केंद्रात सत्तेचा मलिदा लाटत आहेत. खरतर शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेने बरेच धक्के खात आपले स्थान कायम केले आहे.शिवसेना स्थापनेच्या काळात म्हणजे १९६६च्या सुमारास, मुंबईमधल्या गिरणी कामगारांवर कम्युनिस्टांचा पगडा होता. शिवसेना सुरुवातीपासून कम्युनिस्टविरोधी होती. कम्युनिस्टांना मुंबईत हद्दपार करण्यासाठी काँग्रेसनेही शिवसेनेला रसद पुरवल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुंबईमधल्या गिरण्यांमधून शिवसेनेने व भारतीय कामगार सेनेने कम्युनिस्टांना जवळपास हद्दपार केले आणि मुंबईच्या मराठी कामगारांमध्ये शिवसेना व बाळासाहेब अनभिषिक्त सम्राट झाले. मुंबईमध्ये जरी शिवसेनेचा जन्म झाला असला आणि तिची मुळे मुंबईत रुजली असली तरी शिवसेनेला पहिले राजकीय यश ठाण्यात मिळाले. सत्तरच्या दशकात शिवसेनेने ठाणे महापालिका काबीज केली. हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि १९९५मध्ये युतीला पहिल्यांदा महाराष्ट्राची सत्ता मिळाली. १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्यात सेना-भाजपची सत्ता होती. बांगलादेशी मुसलमानांविरोधात बाळासाहेब ठाक-यांनी कठोर भूमिका घेतली होती, आणि देशातील चार कोटी बांगलादेशी मुसलमानांना परत बांगलादेशात धाडण्यात यावे अशी सातत्यपूर्ण मागणी त्यांनी केली. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी त्यांच्याबरोबर क्रिकेट सामने खेळवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा बाळासाहेबांनी कायम विरोध केला. विशेषत: भारतामध्ये होणा-या दहशतवादी कारवायांनंतर त्यांनी पाकिस्तानला येथे खेळू देणार नाही असे जाहीर केले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या एका सामन्याआधी तत्कालिन शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी वानखेडेची खेळपट्टी खणली आणि तेव्हापासून पाकिस्तानचा मुंबईत सामना झालेला नाही. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देऊ नये या भूमिकेचाही बाळासाहेबांनी वारंवार पुनरुच्चार केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांचे निधन झाले. त्यानंतर शिवसेना संपेल असे राजकीय जाणकारांचे मत होते. तरी सुध्दा शिवसेनेचा दबदबा कायम आहे. शिवसेना आज स्वबळावर लढण्याची भाषा करत असून भाजपाने एवढे घाबरण्याचे कारण नाही. खरतर आज ज्या प्रतिक्रिया भाजपाकडून उमटल्या याचाच अर्थ शिवसेनेची गरज भाजपाला आहे हे सिध्द झाले. वर्षभरानंतर जनता कुणाच्या बाजून कौल देईल याची वाट बघू या!

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments