Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयमुली ह्या भारताचे नवीन चलन

मुली ह्या भारताचे नवीन चलन

का भारतीय एनजीओंच्या सर्वेनुसार भारतामध्ये २० लाख वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींपैकी १६ लाख मुली किंवा महिलांची देशभरात मानवी तस्करी केली जाते. यातील बऱ्याचश्या मुली गरीबीमुळे पालकांकडूनच या व्यवसायात ढकलल्या जातात.मुलींचे वडील दलालांशी अगदी घासाघीस करून या मुलीचा मोबदला ठरवतात. एकदा ह्या मुली विकल्या गेल्या की त्यांच्या कुटुंबियांना क्वचितच त्यांच्या बद्दल परत ऐकायला किवा किंवा त्यांच्याशी बोलायला मिळते. सर्वे करणार्यांना असे देखील निदर्शनास आले कि यातील ७८% मुली या पश्चिम बंगाल मधून आलेल्या असतात.२०१४ च्या अधिकृत डेटानुसार पश्चिम बंगाल मध्ये मानवी तस्करीच्या ५४६६ केसेस नोंदवल्या गेल्या त्यानुसार मानवी तस्करीमध्ये भारतातील पश्चिम बंगाल ५व्या क्रमांकावरील राज्य आहे. तसेच मुली आणि लहान मुलांच्या मानवी तस्करी परिवहनाचे मुख्य केंद्र म्हणून बंगालचा अग्रक्रम लागतो. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार २०१५ मध्ये मानवी तस्करीच्या घटनांमध्ये २५% वाढ बघायला मिळते ज्यात मुख्यत्वे ४०% केसेस ह्या लहान मुलांची विक्री आणि गुलाम म्हणून शोषण करण्याच्या आहेत.

माय चॉईसेस फाउंडेशनने भारतभर पसरलेल्या प्रमुख विरोधी-तस्करी गटांबरोबरच केलेल्या एका अध्ययनानुसार त्यांना असे आढळून आले की अलिकडच्या काळात तस्करी करण्यात आलेल्या मुलींचे सरासरी वयोमान १४ ते १६ पासून १० ते १४ वर्षापर्यंत घसरले आहे. या तस्करीला रोखण्यासाठी ग्रामीण भारतातील तरुण मुलींना लैंगिक व्यापारात अडकविणारऱ्या त्यांच्या पित्यांना मोहिमेचे लक्ष्य करण्यात आले आहे कारण यातील संशोधनानुसार, वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकलल्या गेलेल्या मुलींचे सरासरी वयोमान आठ वर्षांपेक्षाही कमी निदर्शनास आले.

पण संशोधकांना एक महत्त्वाचा शोध असा लागला कि हे तस्कर पालकांना मुलींचे लग्न हुंडा देण्याशिवाय  करून देतो म्हणून किंवा मोठ्या शहरातील नोकरीचे आमिष देऊन त्यांना विश्वासात घेतात. देह व्यापारात असलेल्या बऱ्याचश्या मुली ह्या विक्रीद्वारे ह्यात अडकलेल्या असतात .या व्यतिरिक्त असेही आढळून आले आहे कि ह्या मुली  विशेषत: ग्रामीण भागातूनच आलेल्या आहेत. संशोधकांनाही असेही आढळले की हरवलेल्या मुलींचे पालक त्यांना शोधण्याकरिता पोलिसांच्या भीतीपायी पोलिसांकडे तक्रार करण्यास इच्छुक नसतात.

कोर्बा जिल्ह्यातील लेमरू गावातून हरवलेल्या १२ आणि १४  वयोगटातील दोन अल्पवयीन मुलीना तस्करांपासून काही महिन्यांपूर्वी वाकचवण्यात आले. ३ महिलांसह ११ जणांना यात अटक करण्यात आली.

या मुलींवर ६ जणांनी बलात्कार केला आणि त्यांना फार्महाऊसमध्येच ठेवण्यात आले. त्यापैकी एक जवळजवळ विकली गेली आणि तिला देह व्यवसायासाठी दुसर्या शहरात पाठविले गेले

त्या मुलींवर सहा जणांनी बलात्कार केला आणि त्यांना फार्महाऊसमध्येच ठेवण्यात आले. त्यापैकी एका मुलीला  विकण्यात आले होते आणि तिला शरीर विक्रीसाठी दुसऱ्या शहरात पाठविले जाणार होते. आदिवासी वर्चस्व असलेल्या प्रदेशांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये जेथे नोकर्याचे प्रमाण कमी आहे किंवा कमजोर अर्थव्यवस्था  आहे, अश्या ठिकाणी मुलीची तस्करी जास्त प्रमाणात होत आहे तसेच मोठ्या शहरांमध्ये किंवा स्थानिक पातळीवर नोकर्या देण्याचे आमिष देऊन मुलींचे शोषण केले जाते.

गेल्या वर्षी, मुंबईत ठाणे येथील १७ वर्षीय मुलगी विकली गेली आणि शरीर विक्री व्यवसायामध्ये फसली .ती बांगलादेशी होती आणि तिच्या मैत्रिणीच्या ओळखीतील इसमाकडून लग्नाचे प्रलोभन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला गेला. त्याच महिन्यात त्याने तिला बांगलादेशातील दुसऱ्या तस्कराला विकले ज्याने तिला भारतात तिसऱ्या तस्कराला विकले. त्यानंतर तिला मुलगी ठाणे जिल्ह्यात आणले गेले आणि  ठाणे, वाशी, मुंबई आणि बंगलोरमधील विविध ठिकाणी ग्राहकांकडे नेण्यात आले.

अलीकडे या मुलींचे शोषण करण्यासाठी सोशल नेटवर्कचा वापर केला जातो. ह्या मुली  अशिक्षित आणि ग्रामीण भागातील असतात. एजंट अशा परिस्थितीचा फायदा घेतात. ते त्यांचे एफबी प्रोफाइल आणि अगदी वेबसाइट तयार करतात मग त्यांची ग्राहकांना आमंत्रण देणारी चित्रे या प्रोफाइल्स वर टाकतात. या मुलींचे भयंकर शोषण केले जाते आणि त्यांनी विरोध करण्याचे धाडस केल्यास त्यांचे अधिक अमानुष पणे शोषित केल्या जाते. मागील आयुष्यात परत जाण्यासाठी त्यांच्या आयुष्यात कुणीच उरत नाही. राज्यांकडून मोठ्या शहरांमध्ये महिलांची तस्करी वाढली आहे, तरीही सरकारने या बाबतीत मौन पाळले आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये  १२ ते १५  वयोगटातील ६०,००० पेक्षा जास्त मुली घरगुती कामगार म्हणून काम करतात.

शहरात नौकरी देतो या प्रलोभनाखाली मध्यस्थ इसमामार्फत प्रत्येक दहा कुटूंबांपैकी एक मुलगी वेश्याव्यवसायाकडे ढकलली जाते. मानवी हक्कांचे हे उल्लंघन थांबविण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. पुरुष-वर्चस्व असलेल्या समाजात स्त्रियांना त्यांचे हक्क बजावण्याची परवानगी नाही.

आणखी एक उदाहरण म्हंणजे  राजस्थानची ‘राजनट’ ही जमात आपला परंपरागत वेश्याव्यवसाय सोडून देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु  नोकऱ्यांअभावी समाजातील शिक्षित मुलींनाही मुंबईत डान्स बारमध्ये सामील होण्यास भाग पाडण्यात येत आहे. त्या उत्पन्नाद्वारे कमीत कमी त्या आपल्या मुलांना एक चांगले भविष्य देऊ शकतात. ‘राजनट’ किंवा ‘नाट’ राजामहाराज्यांच्या दरबारात नृत्यांगना आणि गायक होते, परंतु साम्राज्यशाहीच्या अस्तामुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवल्या मुळे ते वेश्याव्यवसायाकडे ओढले गेले. समाजातील बहुतेक मुलीं वेश्याव्यासायात ढकलल्या गेल्या तर पुरुष त्यांचे दलाल म्हणून यात ओढले गेले आणि ते परंपरागत चालत राहिले. राज्याच्या बहुतांशी भागांत या जमातीने हे काम सोडले असले तरी काही भागात मुली अजूनही या व्यवसायात आहेत. कारण शिक्षित पुरुषांनाही नोकर्या उपलब्ध नाहीत आणि मुलींच्या बाबतीत परिस्थिती आणखीनच अवघड आहे.

ह्या मुली शिक्षित आणि सन्मानणीय जीवन जगू इच्छितात तरीही ज्या मुलीं शिक्षित झाल्या आहेत त्यांना योग्य नवरे भेटत नाहीत कारण बरेचशे पुरुष बेरोजगार आहेत आणि इतर समाजातील लोकाही या जमातीशी वैवाहिकसंबंध करावयाचे टाळतात .त्यामुळे त्यांच्याकडे जगण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध  नाही.

प्रत्येक राज्यात मुलींसाठी वाईट परिस्थिती आहे.  अशा प्रथा टाळण्यासाठी आपल्याला कठोर पाऊल हवीत

फक्त बेटी बचाओ म्हणणे पुरेसे नाही

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments