Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख"आदर्श" समजणाऱ्यांच्या थोबाडीत बसली!

“आदर्श” समजणाऱ्यांच्या थोबाडीत बसली!

दर्श प्रकरणात भाजपाचे नेते, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, वाय.पी.सिंग, आभा सिंग,अण्णा हजारे या टोळींनी नको ती खोटी ओरड करुन तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आरोपी बनवून टाकले होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना याची दखल घेऊन अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार करावे लागले होते. त्या दिवसापासून अशोक चव्हाण हे मी निर्दोष आहे असे वारंवार सांगत होते परंतु वाचाळ नेते आणि माध्यमांनीही चव्हाणांना आरोपी सिध्द करुन बदनामी सुरुच ठेवली होती. ऑक्टोबर २०१० नंतर आज २२ डिसेंबर २०१७ उजाडले आणि माजी मुख्यमंत्री,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व काँग्रेससाठी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल त्यांना न्याय देणारा ठरला. कालच 2-जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयानंतर सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या नेत्यावरील कलंक पुसले गेले. आदर्शचा जपकरुन तत्कालीन विरोधकांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी २०१४ मध्ये आदर्श प्रकरणावरुन काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. प्रचारामध्ये तसेच प्रत्येक नेत्याच्या तोंडात,माध्यमांमध्ये आदर्शची चर्चा होत होती. भाजपा विरोधी पक्षात असतांना त्यांच्याकडे तत्काली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळे जे काही घडलच नाही त्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करुन काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांना आरोपी बनवून टाकत होते असचं आत सिध्द होत आहे. परंतु टू जी चा निकाल आला,आदर्शही झाले. काही दिवसांपूर्वी सिंचन प्रकरणातही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचेही नाव आरोपींच्या यादीमध्ये आले नाही. याचाच अर्थ भाजपाने सुडबुध्दीने व प्रचाराचा भाग म्हणून तत्तकालीन सत्ताधाऱ्यांना सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी नको तो प्रचार करुन सत्ता हस्तगत केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आदर्श प्रकरणात चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी आधी २०१३ मध्ये तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी परवानगी नाकारली होती. सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल सी विद्या राव यांनी परवानगी दिली होती. या निर्णयाला अशोक चव्हाण यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी झाली. राव यांनी दिलेली चौकशीची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली. याचाच अर्थ या प्रकरणातही फक्त आरोपांच्या पलीकडे काहीच नव्हते यावर शिक्कामोर्तब झाले. चव्हाण यांनी या सर्व प्रकरणात बदनामी झाल्यानंतरही २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये नांदेड जिल्हा मतदार संघातून लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत चव्हाण यांनी काँग्रेसची एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळवले होते. चव्हाण यांचे काम बघता पक्षश्रेष्ठींनी त्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र भाजपा पुन्हा टुजी,आदर्श प्रकरणाच्या निकालावरुन तोंडघशी पडला आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी आता पर्यंत भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित संघटना नको ते आरोप करुन अराजकता निर्माण करण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट होते. भाजपाचा हा खोटारडा चेहरा जनते समोर आला. अशा प्रकारांमुळे जनतेचाही यांच्यावरुन विश्वास उडून जाईल. हे वेगळ सांगण्याची गरज नाही. मात्र सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी इतरांवर खोटे आरोप करुन स्वत:ला आदर्श समजणाऱ्या नेत्यांच्या थोबाडीवर सणसणीत बसली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments