Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखशिवसेनेविरुध्द दाऊद सक्रीय? मुंबईत पुन्हा गँगवारची सुरुवात?

शिवसेनेविरुध्द दाऊद सक्रीय? मुंबईत पुन्हा गँगवारची सुरुवात?

dawood ibrahim, dawood, uddhav thackeray, uddhav, shiv sena, sena

मुंबई हे आपल्या देशातील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक राजधानी आहे. एकदा ही नगरी अंडर वर्ल्डचा विळख्यात सापडली. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या टोळ्यांचे वर्चस्व मुंबईवर राहिलेले आहे. शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुखपत्रकार खासदार संजय राउत यांना धमकी देण्याच्या आरोपात पलाश बोस या कोलकातावासीयास महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. पलाश बोस जिम इंस्ट्रक्टर असून तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य आहे म्हणे. त्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना फोन, टेक्स्ट मॅसेज आणि वीडियो कॉलचा वापर करून केला आणि याद्वारे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी संजय राऊत यांना धमकी दिली. त्याने इंटरनेट फोनचा वापर केल्याने याच्याच आधारावर पोलीस त्याच्यापर्यंत कोलकाता येथे पोचू शकले. शिवसेनेला लक्ष्य करण्याची दाऊद इब्राहिम टोळीची ही काही पाहिलीच वेळ नाही. आपण फ्लॅशबॅक मध्ये जर पाहिले तर दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून शिवसेनेला धोका निर्माण झालेला होता. बर्‍याच वर्षांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक 62 वर्षीय अशोक सावंत यांची कांदिवलीत त्यांच्या राहत्या घराबाहेर हत्या केली होती. अशोक सावंत हे सतत दोनवेळा नगर सेवक होते आणि सहायक पुलिस आयुक्त सुभाष सावंत यांचे बंधू होते. अंडरवर्ल्ड टोळ्यांशी होणार्‍या अनेक झडपांत त्यांची कामगिरी महत्वपूर्ण होती. अशोक सावंत एका मित्राला भेटून घरी परतल्यावर ही घटना घडली. समता नगर येथील त्यांच्या ‘सूर भवन’ नावाच्या बंगल्याबाहेर एका वाहनाजवळ उभे असलेल्या दोन जणांनी त्यांना रोखले आणि पळून जाण्यापूर्वीच त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यां दोन आरोपींपैकी जग्गा हा कुविख्यात गुन्हेगार आहे.

काहीं वर्षांपूर्वीच सावंत यांनी केबल व्यवसायात पाउल ठेवले होते. अहमदनगर येथील केडगाव येथे पक्षाच्या उपनेतत्यासहित आणखीन दोन नेत्यांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. दोन जणांनी शहर उपप्रमुख संजय कोटकर आणि पक्ष नेते वसंत ठुबे यांच्यावर हल्ला केला आणि जायमोक्यावरच दोघांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर अगोदर गोळी झाडून नंतर धारदार शस्त्रांनी ठार करण्यात आल्याचे अहवालात म्हटले गेले. शिवसेनेचे कार्यवाहक शैलेश निमसे यांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृत शरीर ठाण्याच्या शाहपुर तालुक्यातील एका गावात आढळून आले. निमसे हे शिवसेनेचे शाहपुर तालुक्याचे उपाध्यक्ष होते. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे मृत शरीर जाळण्यात आले असल्याचे म्हटले जाते. देवचोला गावाजवळ त्यांचे मृत शरीर सापडले होते.

शिवसेनेचे शाखा प्रमुख , रमेश जाधव यांनी उपनगरीय मलाड येथील आपल्या घराबाहेर दोन गटात होत असलेल्या मारामारीत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. सोहेल नावाने ओळख पटलेल्या एका हल्लेखोराने जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. मानेवर खोल जखमा झाल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोचता पोचता त्यांचा मृत्यू झाला. 19 ऑक्टोबर 2017 रोजी पुण्याजवळ एका शिवसैनिकाची काही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. स्थानिक पक्ष प्रमुख राजू देसले हे आपल्या कार्यालयाबाहेर बसले होते. यावेळी काही अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. 2014 नंतर राज्यभरात अनेक शिवसैनिकांवर हल्ले झाले, त्यांच्या हत्या करण्यात आल्या. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही मूग गिळून गप्प आहेत, हे नवलच म्हणावे लागेल. काल रात्री शिवसेनेचे माजी नगर सेवक सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी सावंत यांच्यावर तीन राउंड फायरिंग केली आणि दुचाकीवरून पळून गेले. शिवसैनिकांवर हल्ले का होत आहेत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे? हा प्रश्न सद्ध्या भेडसावत आहे. हे एका नव्या गृह युद्धाच्या युगाचा प्रारंभ तर नाही ना? असाही प्रश्न निर्माण होतो.

आजकाल उदयास आलेले अरुण गुलाब अहीर, हे पूर्वी अंडर वर्ल्ड मध्येच एका टोळीचे प्रमुख होते.

गवळी आणि त्यांचे बंधू किशोर ऊर्फ पप्पा यांनी 1970 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्ड ‘भायखळा’ टोळीत प्रवेश केला. राम नाईक आणि बाबू रेशीम यांची गुन्हेगारी टोळी भायखळा, परळ आणि सात रस्ता या मध्य मुंबईच्या भागात सक्रिय होती. 1988 साली राम नाइक पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. ही संधी साधून गवळी यांनी या टोळीवर ताबा मिळवला आणि दगडीचाळ येथील आपल्या घरातूनच सूत्र संचालन करण्यास सुरुवात केली.

मध्य मुंबईतील बहुतेक भागावर त्याच्या आपराधिक गतिविधि सुरू होत्या. ऐंशी आणि नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात दाऊद इब्राहिम याच्या डी गँग बरोबर त्याचे गँगवॉर सुरू होते. गवळीने अखिल भारतीय सेना या नावाने राजकिय पक्ष देखील काढला होता. 1980 च्या दशकात त्यास राजकिय आश्रय मिळाला. तत्कालीन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अरुण गवळी व साई बंसोड़ सारख्या हिंदू गुंडांविरुध्द कडक कारवाई केल्याप्रकरणी पोलिसांविरुद्ध टीका केली होती. यां गुंडांना ‘आमची मुले’ असे म्हटले होते.

बाळासाहेब ठाकरे यांना एका प्रतिस्पर्धी गँगस्टरने सिटी टॅब्लॉइड या इंग्रजी दैनिकाच्या मुख पृष्ठावरच उघडपणे आव्हान दिले होते. खरे तर अरुण गवळी याने 1990 च्या दशकातच शिवसेनेकडून फारकत घेतली होती. त्याने बरेच शिवसैनिक मारले आणि अखिल भारतीय सेना नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष काढला. 2004 साली तो आपल्याच पक्षाच्या तिकिटावर मुंबई चिंचपोकळीचा आमदार झाला. अरुण गवळीची मुलगी बृहन्मुंबई महानगरपालिकेत नुकतीच नगरसेवक झाली आहे. देश सोडून पळून जाण्याची कधी गरज न भासलेला आणि तुरुंगात राहून सुद्धा संघर्ष सुरू ठेवणारा, असा तो एकमेव गँगस्टर आहे,

यां दिवसांत राज्याच्या अनेक भागांत शिवसेनेच्या नेत्यांच्या हत्या होताहेत. जणू परत गँगवारची सुरुवात झाली आहे. यां हत्यांमागे नेमके कोण आहेत, ते मात्र एक कोडेच आहे. काहीं प्रकरणांत भाजपच्या नेत्यांना अटक करण्यात आली. मात्र बरीच प्रकरणे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments