Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखगरुड़ पुराण, आत्मा, स्वर्ग आणि नर्क

गरुड़ पुराण, आत्मा, स्वर्ग आणि नर्क

गरुड़ पुराण, Garuda Purana, Garud Puran

ज एका असामान्य विषयावर लेखनी उचलत आहे. कारण आत्ताच तीन दिवसांपूर्वी आई समान काकी वारल्या. याप्रसंगी कुटुंबातील एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यास गरुड पुराणाचे पठण का केले जाते, यावर चर्चा झाली. हिंदू धर्मात अनेक प्रथां पाळल्या जातात. ही देखील त्यां पैकीच ही एक. या शास्त्राचा संबंधी जे काही माझ्या विचार बुद्धीत बसले, ते लेखनीबद्ध करीत आहे. गरूड पुराण हे विष्णु पुराणांपैकी एक आहे. यात सुक्ष्म जगत आणि मानव सुक्ष्म शरीरादरम्यान पत्राचाराची एक अद्भुत सूची आहे. हिंदू धर्मात अंतिम संस्कारात तेराव्या दिवशी वैकुंठ समाराधना नावाचा एक कार्यक्रम केला जातो. याप्रसंगी सात हजार वर्षांपूर्वीचा गरुडपुराण ग्रंथ पठण करून पुण्य मिळविले जाते. हिंदू धर्मात अंतिम संस्काराच्या तेराव्या दिवशी वैकुंठ समाराधना नावाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते व त्यात सात हजार वर्षांपूर्वीच्या गरुड पुराण या ग्रंथाचे पठण केले जाते. गरुड़ पुराणात भगवान विष्णु (श्री हरी) आणि त्यांच्या वाहनाचे वर्णन करण्यात आले आहे.

गरुड़ पुराण भगवान विष्णु (श्री हरि) आणि त्यांचे वाहन गरुड़ यांच्यातील चर्चेवर आधारीत पाठ आहे. पृथ्वीवरील पुण्य कर्मांचे बक्षीस आणि पाप कर्मांच्या शिक्षेसंबंधी गरुड भगवान विष्णु यांना प्रश्न विचारतात आणि ते त्यास उत्तर देतात, असे या वर्णनाचे स्वरुप आहे. आत्मा पुनर्जन्म घेण्यापूर्वी अगोदर नर्क आणि स्वर्गातून प्रवास करीत जातो. जन्मापूर्वी नर्कात शिक्षा भोगतो अथवा स्वर्गात आनंदाचा उपभोग घेतो. या जन्मी केलेल्या पुण्य अगर पापाचे फळ पुढील जन्मी मिळणार, असे सुद्धा पुराणात म्हटले गेले. पुराण सातत्याने माणसाचे मार्गदर्शन करते. यात अनु सिद्धांतापासून ते प्राणी शास्त्रापर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. गरुड पुराणात आध्यात्मिक घटनांचे सुंदर वर्णन आहे आणि ते समजण्यासाठी त्यांचा उद्देश माहीत करून घेण्याची जिज्ञासा व चिकित्सक बुद्धी असावयास हवी. हे खुल्या मनाने वाचण्यासारखे पुराण आहे. थोड्या आध्यात्मिक मनोवृत्तीने अभ्यास केला तर ते समजण्यासाठी आणखीनही सोयीस्कर होईल.

आजच्या या आधुनिक काळात मृत्यू आणि त्या संबंधीची विधी खूप थोडक्यात सोयीस्कररित्या आटोपली जाते. वेगवेगळी निमित्त साधून याकडे दुर्लक्ष केले जाते, हे दुर्दैव म्हणा. खरे तर मानवी शरीर मृत्यू पावते आणि मुळात ही परलौकिक जगात प्रस्थान करण्याची महत्वपूर्ण क्रिया होय.

लोकांना सहसा वाटते की हे शरीर केवळ एक शव आहे आणि हे एकदा जाळले की प्रश्नच मिटला. आधुनिक काळातील आधुनिक विचारांनी प्रभावित होऊन आध्यात्म सारख्या महत्वपूर्ण विषयाला सोयीस्कर बगल दिली जाते. मुळात हे तुटपुंज्या ज्ञानाचे एक प्रकारे साइड इफेक्ट्स म्हणावे लागेल.

मोक्ष सिद्धांतानुसार धार्मिक जीवन जगण्याच्या पद्धतीस विधी असे म्हटले गेले. हा शास्त्राचा महत्त्वपूर्ण भाग असून यालाच विधी असे म्हटले जाते. हा शास्त्राचा सर्वात महत्वपूर्ण भाग आहे. यातून सकारात्मक कर्म करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलेले असून नकारात्मक कृत्यांना आळा घालण्यात आलेला आहे. यालाच शास्त्राच्या भाषेत अथर्वदा असे म्हटले गेले.

प्रेत कांडात भूत अर्थात मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या परलौकिक प्रवासाचे वर्णन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने यम देव, चित्रगुप्त, आणि इतर देवतांची एक सभा असते. यात मृत व्यक्तीच्या पाप पुण्याचा लेखा जोखा मांडला जातो. सविस्तर चर्चेअंती त्यास पुण्य कर्मे केली असल्यास स्वर्गात आणि पाप कर्मे केली असल्यास नर्कात पाठविण्याचा निर्णय घेण्यात येतो. पाप आणि पुण्य कर्मे सारख्याच प्रमाणात असली तर त्यास पृथ्वीवर परत पाठविण्यात येते. या समस्त बाबी धर्म आणि अधर्माशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.

या जन्मी केलेल्या पाप कर्मांसाठी मृत्यूनंतरचे 24 प्रकार वर्णन करण्यात आले आहे. यांत कुम्भीपकम आणि कृमी भोजनम चा समावेश आहे. या प्रकरणातील शेवटच्या भागात आत्मज्ञानाशी संबंधित आवाहन करण्यात आले आहे. यात मोक्षप्राप्ती करिता आवश्यक असलेल्या बाबींचे वर्णन आहे.

मुळात गरुड पुराणाचा हाच मुख्य हेतू आहे. गरुड पुराण नेहमीच अंत्य संस्काराच्या कार्यक्रमात पठण केला जातो. कारण यात अशा प्रसंगी पठण करण्यायोग्य सर्व मंत्रांचा समावेश आहे. यानुसार पूर्वजांच्या समस्त पापांचे क्षालन होते.

गरूड पुराणानुसार माणसाच्या मृत्यूच्या अकराव्या आणि बाराव्या दिवशी मृत व्यक्ती आपल्या मृत नातेवाईकांना भेटते. म्हणुनच हा दोन दिवसीय कार्यक्रम अत्यंत महत्वपूर्ण समजला जातो. भगवान विष्णुच्या दरबारातील अर्थात वैकुंठातील द्वारपाल जय आणि विजय या दोघांना सनातू कुमार नावाच्या एका मुनीने श्राप दिला असल्याने ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप यां दोन दानवांच्या रुपात जन्मले होते. त्याचप्रमाणे सनातुकुमार यांनी प्रह्लादाच्या रुपात सत् युगात जन्म घेतला होता. के रूप में हुआ था। राक्षसांना वराह अवतार भगवान विष्णु यांना नृसिंह अवताराद्वारे ठार करण्यात आले होते. लाखों वर्षांनंतर त्रेता युगात त्यांनी परत रावण आणि कुंभकर्णाच्या रुपात में पुनर्जन्म घेतला. त्यातच सनातुकुमार यांचा जन्म विभीषणच्या रुपात झाला होता. राक्षसांचा वध भगवान विष्णु यांचे अवतार प्रभु रामचंद्र यांनी केला होता. लाखों वर्षांनंतर त्यांना द्वापर युगात शिशुपाल आणि धनधवक्त्र यांच्या रुपात पुनर्जन्म मिळाला. सनातुकुमार यांना अक्रूरच्या रुपात पुनर्जन्म मिळाला होता. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णुचे अवतार असून यांनी त्यांचा वध केला. वरील तिन्ही घटनांविषयी विचार केला तर जय, विजय, सनातुकुमार आणि भगवान विष्णु यांचा लक्षावधी वर्षांच्या अंतराने तीन वेळेस पुनर्जन्म झालेला असून हा पुनर्जन्माचा नियम आहे.

चांगल्या कर्मांच्या आधारावर आत्मदेव स्वर्गात जातात आणि पाप कर्मांच्या आधारावर नरकात जातात. याठिकाणी माणूस पृथ्वी लोकांकडून स्वर्गाकडे जेव्हां प्रवेश करतो, तेव्हां काल मर्यादा कमी होते आणि जेव्हां भूलोकांकडून नरकात उतरतो, तेव्हां काल मर्यादा वाढते. तुम्ही नारनिया चित्रपट पाहिला असेल तर यातून हे तथ्य स्पष्ट होते. 25 वर्षापासून नार्नियात असलेली मुले लंडनला पोचतात, तेव्हां ते परत लहान मुले होतात. असेच काहीसे स्वर्ग आणि नरकाचे आहे. स्वर्गात व्यतीत होणारा एक दिवस हा पृथ्वीवरील एक वर्षाएवढा असतो. म्हणुनच सनातन धर्मात असे म्हटले आहे की, जर कुणी पाप कर्मे केली असतील तर तो नरकात जाण्यासाठी तात्काळ पृथ्वीवर जन्म घेईल. मात्र पुण्य कर्मे केली असतील तर त्यास पुनर्जन्म घेण्यासाठी अनेक वर्षे लागतील. यासाठीच स्वर्गात जाईपर्यंत त्यास भोजन मिळण्यासाठी तिथी करावी लागते. गरुड़ पुराणात आत्म्याविषयी असे म्हटलेले आहे की, स्वर्गात गेल्यावर आत्मा आपल्या नातेवाईकांना भेटत असतो. यां धारणा समजण्यासाठी थोडीशी अडचण निश्चितच येते. मात्र हिंदू धर्मात यां सर्व अडचणींचे समाधान करण्यात आले आहे.

बर्‍याचदा प्रत्येकास शारीरिक आणि भावनिकरित्या नातेवाईकांची गरज पडते. मात्र कधी कधी यां गरजा पूर्ण होत नसतात. ही मुळातच मृत व्यक्तींच्या प्रस्थानानंतर त्यांना त्यांच्या याच अपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी असलेल्या प्रथा आणि विधी आहेत. यातूनच जगण्याचा चांगला मार्ग निवडणे आणि आपल्या वाईट गुणांवर पश्चात्ताप करणे आणि क्षमा याचना करणे, हा एकमेव शुद्ध हेतू आहे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments