Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभुजबळांचे 'मातोश्री'वर पेढे!

भुजबळांचे ‘मातोश्री’वर पेढे!

राजकारणात कधी कुणी कायम शत्रु नसतो. आज त्याचा प्रत्यय आला. मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. पेढे दिले. भुजबळांच्या जामीनावर सुटका झाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून भुजबळांच्या अटके बाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. ”भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता त्याचे विस्मरण महाराष्ट्राला झालेले नाही. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा”,अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भुजबळांवर टीका केली होती. भुजबळ शिवसेनेत असते तर त्यांची अशी अवस्था झाली नसती. आम्ही कुणाशीही वैर ठेवत नाही. अशा स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडून एका प्रकारे आमच्या मनात भुजबळांबद्दल आपुलकी आहे,कोणतेही शत्रुत्व नाही हाच संदेश त्यांनी दिला होता. शेवटी शत्रुत्व कुणीही कुणा बद्दल ठेवू नये. राजकारणातही तसं होत नाही. छगन भुजबळ यांच्याबद्दल सध्या वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. भुजबळांच्या पाठित राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच खंजीर खुपसला अशी चर्चा होती. भुजबळांना जाणून बुजून सरकारने तुरुंगात ठेवले होते अशीची चर्चा होते. शेवटी भुजबळ जो पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार नाही तो पर्यंत तर्क वितर्क लावले जातील. राजकीय आखाडे बांधले जातील. भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा निरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंकज भुजबळ यांनामार्फत दिला. माणूसकी या नात्याने उध्दव ठाकरे यांनी काळजी घेतली असंल तर ती त्यात काहीही गैर नाही. कारण मोठ्यांचा सन्मान करणे हीच आपली खरी संस्कृती आहे. पंकज भुजबळ मातोश्रीवर का गेले असतील. पंकज यांच्या मातोश्रीवरुन भेटीने छगन भुजबळांच्या मनात काही वेगळे विचार येत आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित राजकीय मंडळींच्या मनात उपस्थित होत राहतील. छगन भुजबळ हे शिवसेनेत परत जातील अशी सुतराम शक्यता नाही. शिवसेनेने भुजबळांना खूप काही दिलं भुजबळही ते उपकार विसरले नाहीत. राष्ट्रवादीमध्येही भुजबळांना सन्मानाचीच वागणूक मिळत आलेली आहे. १० जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनानिमीत्त पुणे येथे कार्यक्रमात प्रथमच भुजबळ सभेमध्ये आपले मत व्यक्त करणार आहेत. भुजबळ नेमके काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. खरतर भुजबळांची त्यांच्याच पक्षावर नाराजी असेल तरी सुध्दा ते पक्षावर त्यांच्या अटकेचे खापर फोडणार नाही. कारण भुजबळांना पूर्णपणे त्या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. भुजबळांची सुटका ही जामीनावर झालेली आहे. मात्र आज मातोश्रीचे तोंड गोड करण्याचे मोठपण भुजबळांनी दाखविले ते निश्चितच स्वागतहार्य आहे.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments