Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभाजपाचा 'ढोंगी' राष्ट्रवाद!

भाजपाचा ‘ढोंगी’ राष्ट्रवाद!

भाजपाने सत्तेच्या मस्तीत ‘जय जवान जय किसान’ या घोषणेचा अपमान केला. सत्तेच्या मस्तीच हे उदाहरण आहे. ‘सैनिक वर्षभर सीमेवर असतात आणि इकडे गावात त्यांच्या बायका बाळंत होतात, असे संतापजनक आणि सैनिकांचा आणि त्यांच्या बायकांचा अपमान करणार विधान भाजपाचे मस्तवाल आमदार प्रशांत परिचारक यांनी केले होते. त्याच आमदार परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला व पाठिंबा दिला त्यांना राष्ट्रवादाचा बुरखा घालण्याचा अधिकार नाही. अशा लोकांवर गोळ्या झाडल्या पाहिजेत हीच त्यांची लायकी आहे. सत्तेत राहण्याचा त्यांना अधिकार नाही. सीमेवर सैनिकांचे रोजच रक्त सांडत आहे आणि इकडे सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणाऱ्यांनाचा सत्ताधारी भाजपाच पाठिशी घालत आहेत. जणू अपमान करण्याचा त्यांना पुरस्कार दिला जातो. ज्यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधीची हत्या केली तीच मंडळी आज सत्तेत बसली. हत्या करणाऱ्या विचारधारेची मंडळी ही देशासाठी लाभलेल करंटेपणाच आहे. ‘तोडा आणि फोडा’ विचारधारा देशासाठी धोकादायक असून जनतेची छळछावणी बनली. कोणताही मंत्री,आमदार,पदाधिकारी,कार्यकर्ता हा महापुरुषांचा तर कधी अधिकाऱ्यांचा तर कधी इतर समाजाला लक्ष्य करण्याचा नीच पणा करत आहेत. ‘जय जवान जय किसान’ या घोषणेचे भाजप राज्यात,देशाची वाट लागली. ‘जय जवान’ या आपल्या प्रिय घोषणेचे ‘बारा’ वाजवून भाजप सरकारने आमदार प्रशांत परिचारक यांना विधिमंडळात जणू पायघड्य़ाच घातल्या आहेत. प्रशांत परिचारक यांचे विधिमंडळातील निलंबन रद्द करण्याचा ठराव ज्यांनी मंजूर केला व ज्यांनी त्या ठरावास मूक संमती दिली ते सर्वच देशाचे दुश्मन आहेत. ज्यावेळी परिचारक यांच्याविरोधात निंदाजनक ठराव आला होता त्यावेळी त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. आताही परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाला सगळ्य़ा आमदारांनी तसाच एकमुखी विरोध करायला हवा होता. परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य आहेत व भारतीय जनता पक्षाचे आहेत.‘सैनिक वर्षभर सीमेवर असतात आणि इकडे गावात त्यांच्या बायका बाळंत होतात,’’ असे परिचारक म्हणाले होते. देशाच्या जवानांविषयी व त्यांच्या कुटुंबीयांविषयी देशाच्या इतिहासत असं विधान आतापर्यंत कुणीही केले नव्हते. भाजप आमदाराच्या या विधानाबद्दल विधिमंडळात त्यावेळी गदारोळ झाला व त्यांचे निलंबन करावे लागले. देशाच्या १२५ कोटी जनतेचा हा अपमान असल्याचा निंदाजनक ठराव तेव्हा मांडला गेला व मंजूर केला गेला. मात्र त्याच सभागृहाने सैनिकांचा अपमान करणाऱ्या गुन्हेगाराला पुन्हा पायघड्य़ा घालाव्यात यासारखी दुःखद आणि संतापजनक घटना नाही. महाराष्ट्रातील लाखो आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांवर राष्ट्रवादाचा खोटा बुरखा घातलेल्या सरकारने केलेला अपमान आहे. अहमदनगरमध्ये भाजपचा उपमहापौर छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असभ्य उद्गार काढले होते. त्याचेही निलंबन झाले. परिचारक यांचा गुन्हा छिंदमपेक्षा कमी नाही. व सत्तेच्या भांगेने डोके बधिर झाल्याप्रमाणे ते फक्त विधानसभा विजयासाठी गणिते मांडत आहेत. प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवले असते किंवा छिंदमप्रमाणे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असता तर आभाळ कोसळले असते काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक ‘पोस्ट’ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल अहमनगरचा एक पोलीस हवालदार रमेश शिंदे याला सरळ बडतर्फ केले जाते, पण प्रशांत परिचारक यांना मात्र सैनिकांचा अपमान करूनही ताठ मानेने विधिमंडळात आणले. शिंदेचे निलंबन कायम आहे व भाजप आमदार परिचारक मात्र मोकाट आहेत. सत्तेच्या मस्तीत राष्ट्रवादाचा बुरखा घातलेल्या या सत्ताधाऱ्यांचा बुरखा टराटरा फाटेल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments