Wednesday, May 8, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकाँग्रेस गटा-तटाने पोखरली!

काँग्रेस गटा-तटाने पोखरली!

काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकल्या गेल्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस सोशल मीडियाच्या कुबड्यांचा आधार घेत आहेत. तो राजकीय पक्षाने घेतलाही पाहिजे. सोशल मीडीयाचा वापर हा आज गरजेचा आहे कारण २०१४ मध्ये भाजपाने त्याचाच प्रभावी पणे खरा खोटा वापर करुन सत्ता हस्तग गेली हे विसरुन चालता येणार नाही. गुजरातचे पाटीदार नेते हार्दीक पटेल काँग्रेसच्या मीडिया सेलला काही खास टीप्स देण्यासाठी गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलशी संवाद साधणार आहेत. भाजपाने २०१४ मध्ये सोशल मीडियाचा वापर करुन निवडणूका जिंकल्या आणि त्याचा सर्वात जास्त फटका काँग्रेसला बसला होता हे ताजे उदाहरण आहे. कोमामध्ये गेलेली काँग्रेस आता तेच सोशल मीडियाचे अस्त्र २०१९ साठी वापरणार आहे. हार्दिक पटेल सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाच्या नाकर्तेपणा जनतेसमोर मांडण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या टीमशी संवाद साधून काही खास टीप्स देतील. हा काँग्रेससाठी फायद्याचाच ठरेल. सोशल मीडिया सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पहिले जाते. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍपच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूसदेखील आपले विचार, आपल्या भावना जगासमोर मांडू शकतो. परंतु काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्यात जिल्ह्यात शहरात काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काँग्रेसच आतोनात नुकसान झाले आहेत. एकीकडे काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन त्यांचे नेते तन-मन धनाने पक्षामध्ये पुन्हा जाण यावी यासाठी मेहनत करत आहेत. परंतु सर्वत्र जी अंतर्गत वादावादी सुरु आहे ती धोकादायकच आहे.  खरतर भाजपच्या राज्य आणि केंद्रातील प्रमुख नेत्यांच्या विधानातील विसंगती आणि आश्वासनांचा विसर हे चव्हाट्यावर आणण्याची काँग्रसेला चांगली संधी आहे. सध्या देशातील २० कोटी जनता सोशल मीडियावर असून २०१९ मध्ये त्यामध्ये २५ टक्के वाढ होईल. गुजरातच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत साडेअकरा टक्केमते काँग्रेसच्या बाजूने ‘स्विंग’ झाली आणि यामध्ये सोशल मीडियाची मोठी भूमिका होती. सोशल मीडियाचा आपली मते जनतेवर लादण्यासाठी भाजपची मंडळी कसा उपयोग करतात. यापुढे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ई-मेल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमांचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: मतदान केंद्रनिहाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन, रामदेवबाबा, लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने, महागाई, मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची वक्तव्ये इत्यादी संदर्भातील ध्वनिचित्रफितींचा समावेश असलेले सादरीकरण काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर करण्यात आले आहेत. त्याचा फायदा निवडणूकांमध्ये काँग्रसेला होऊ शकतो. परंतु काँग्रेसला गटा तटाचे राजकारण बाजूला सारुन पुढे जावे लागेल अन्यथा भाजपाच्या अमापधन शक्तीपुढे काँग्रेसला पुढे फटका बसू शकतो. काँग्रेसने हे वेळेवर समजून घेतले नाही तर २०१९ मध्ये विरोधी बाकावर बसावे लागेल. असाही प्रकार घडू शकतो.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments