Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकराडांना संघाचे लेबल!

कराडांना संघाचे लेबल!

विधानपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्थाचे उमेदवार रमेश कराड यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली. यामध्ये राष्ट्रवादीची मोठी नाचक्की झाली. त्याला मुख्य कारण असे की, कराड यांनी २ मे रोजी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. कराड हे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ होते परंतु कराड हे कित्येक वर्षापासून भाजपामध्ये काम करत होते. भाजपामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते ऐनवेळी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीवाले बनले. राष्ट्रवादीने त्यांना उमेवादवारीही दिली. विशेष म्हणजे ज्या उस्मानाबाद, लातूर, बीड मतदार संघातून उमदेवारी दिली तो मतदारसंघ माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचा मतदार संघ होता. काँग्रेसकडून राष्ट्रवादीने ही जागा घेतली. कराड यांना उमदेवारी दिली. कराड यांच्या नावाला काँग्रेसचा विरोध होता कारण, ते संघामध्ये काम करत होते आणि त्याला काँग्रेसच्या मंडळींनी मतदान केले नसते. राष्ट्रवादीने काँग्रेसला विश्वासात घेतले नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या घडाळ्याचे काटे उलटे फिरले आणि कराडांना आज दुपारी मुदत संपण्याच्या अर्धातास आधी आपला अधिकृत उमदेवारी अर्ज मागे घ्यावा लागला. धनंजय मुंडे विरुध्द पंकजा मुंडे ही लढाई तर आहेच परंतु पंकजा जिंकल्या आणि धनंजय हरले असाही प्रकार त्याला म्हणता येणार नाही. कारण रमेश कराड हे जर संघामध्ये सक्रिय होते आणि अचानक ते राष्ट्रवादीत प्रवेश मिळवून त्यांनी उमेदवारी मिळवल्याने त्याला विरोध होणार नाही. अशक्यच होतं. राष्ट्रवादीने कराड यांना उमेदवारी जाहीर करुन आपण पंकजा मुंडेचा जवळचा माणूस फोडला अशा अर्विभावात ही मंडळी होती. शेवटी संघात काम करणारा माणूस पक्षात प्रवेश करुन त्या विधानपरिषदेच्या उमेदवारीची बक्षीसी दिली जाते ही जुन्या जाणत्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंडळींनाही मंजुर नव्हते. राजकारणात इकडून तिकडे तिकडून इकडे असा खेळ निवडणूकांच्या तोंडावर दिसून येतो. भारतीय जनता पक्षाकडून सुरेश धस उमेदवार आहेत त्यांनीही राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक जगदाळे यांनीही बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याशिवाय अन्य चार जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी जगदाळे वगळता उर्वरित चौघांनी दुपारी दोनपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर अडीचच्या सुमारास कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात भाजपचे सुरेश धस आणि अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार जगदाळे हे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षात जुने जानते मातब्बर नेते असतांना सुध्दा बाहेरुन नेते घेण्याची गरज नव्हती. कराड सारखे संघामध्ये काम करणारे नेते एकाच दिवसात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवत असतील तर राष्ट्रवादीसाठी ती धोक्याची घंटा होती. राष्ट्रवादीने येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणूकांचा विचार करुनही कराड यांना माघारी घेतले हे राष्ट्रवादीच्या फायद्याचेच ठरेल.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments