Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमोदी, जेटलीच खरे गुन्हेगार?

मोदी, जेटलीच खरे गुन्हेगार?

भ्रष्ट सेटींगबाज सरकारच्या आशीर्वादाने भामटा नीरव मोदी आणि त्याचा मामा २१ हजार ३०६ हजार कोटी रुपयांचा चुना लावून विदेशात छू झाला. बोलबच्चन पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटलींनी एवढ्या मोठ्या घोटाळ्यावरुन तोंड उघडले नाही. त्यांच्या तोंडाला लकवा मारला का? असा प्रश्न पडतो. छोटा मोदी नीरव मोदीच्या बद्दल नागपूर येथे सरकारची शेकडो एकर जमीन कवडी मोल भावात घेतलेल्या रामदेव बाबाने ‘चोंपडेपणा’ केला. रामेदव म्हणाले की,मी फक्त एकाच मोदीला ओळखतो,ते आहे ‘नरेंद्र मोदी’! जे घोटाळे करत आहेत त्यांच्यामुळे देशाचे नाव खराब होते. नीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल. मोदी सरकार त्याला योग्य जागी धाडेल. परंतु रामदेव हा सरकारचा प्रवक्ता आहे का? अर्थमंत्री,पंतप्रधान यांच्या तोंडाला लखवा मारल्याने त्यांचे तोंड बंद आहेत का? देशात आर्थिक स्थिती वाट लागली. पाच दिवस उलटले तरी सुध्दा बोलबच्चन पंतप्रधान मोदींच्या तोंडातून भामट्या नीरव मोदी बद्दल एकही शब्द का उच्चारला नाही. आणि घोटाळ्यावरुन निघणार नाही. कारण नीरव हा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या सोबत २०१६ मध्ये दाबोसमध्ये गेला होता. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही जाऊन आला. नीरव मोदीच ही मंडळी काही करणार नाही कारण यांचा तो दाता आहे. नीरव हा उद्योगपती अंबानीचा नातेवाईक आहे. अंबानीची भाची इशीता सलगावकर ही नीरवचा भाऊ निशलची पत्नी आहे. अंबानी,अदानी हे मोदींचे भक्त असून भाजपाचे फायनांन्सर आहेत. संपूर्ण सरकार ज्यांच्या इशाऱ्यावर चालते ते अंबानी आणि अदानी आहेत. अशा उद्योगपतींनी सरकारकडून ८ लाख ५५ हजार कोटी रुपयाचा कर्जाच्या नावाने पैसा पचवीला. सरकार देश कमी आणि दलाली जास्त करत आहेत अशी परिस्थिती चालली आहे. देशाची आर्थिक स्थितीला खड्यात घेऊन गेली. घोटाळ्याचा गंभीर विषय आहे. परंतु सोशल मीडियावर एक मजकूर फिरत आहेत तो “जेथे कुठे असशील तेथे खूश राहा, खूप भरभराट कर आणि कर्जाची चिंता करू नको. त्याची वसुली बँकवाले आमच्यासारख्यांकडून पन्नास-शंभर रुपये घेऊन करतीलच. सध्या आम्ही मल्ल्यासाहेबांची कर्जे फेडत आहोत, नंतर तुझीही फेडून टाकू. या सर्वांची आता आम्हाला सवय झालीय. कधी कधी तर असे वाटते की, तुमच्यासारख्या बड्या लोकांनी बँकांकडून घेतलेली कर्जे फेडण्यासाठीच आम्ही कमावतो. बहुधा आमचा जन्मही त्याचसाठी झाला असावा. तुला चिंता करण्याचे काही कारण नाही. तू बुडविलेल्या प्रत्येक पै न पैची बँकांना व्याजासह परतफेड करून आम्ही आमची देशभक्ती दाखवून देऊ!” हे सत्यही आहे. कारण बँकांमध्ये जे घोटाळे होतात व पैसे बुडविले जातात त्याची भरपाई देशातील सामान्य माणसांनाच करावी लागते. सरळ शब्दांत सांगायचे तर बँकांमधील पैसा सामान्य नागरिकांचाच आहे. बँकेत जे पैसे ठेवता त्यावर तुम्हाला ठराविक व्याज मिळते. त्याच बँकेकडून तुम्ही कर्ज घेतले तर त्यावर तुलनेने तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागते. ठेवी व कर्ज यांच्या व्याजदरांमध्ये फरक असतो. तोच बँकांचा फायदा असतो व त्यावरच बँका चालतात. बँकेला जास्त फायदा झाला तर ठेवींवर जास्त व्याज मिळावे, अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात असे होत नाही. याचे कारण असे की मोठमोठे महारथी बँकांचे पैसे बुडवून बसले आहेत. त्यांच्याकडून त्या पैशाची वसुली होणे शक्य नाही, असे बँकांनी ठरवून टाकले आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार बँकांच्या थकीत कर्जांचा आकडा ७.३४ लाख कोटी रुपयांचा आहे. काही लोक मालामाल होऊन परदेशांत निघून जातील व इकडे भारताची अर्थव्यवस्था डामाडौल झालेली असेल. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची कुरघोडी करण्यापेक्षा या घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळून भविष्यात कोणी असा घोटाळा करण्यास धजावणार नाही. हे सरकारचे काम कमी आणि दलालीचे काम जास्त करत आहेत. नीरव मोदीच्या विरोधात शेकडो तक्रारी नंतरही आणि त्याला हजारो कोट्यवधी रुपये सहज कसे काय मिळतात. रवीवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन भाषण झाली पंरतु त्यांनी नीरव च्या घोटाळ्यावरुन चकार शब्दही काढला नाही. कोट्यवधी रुपयाचे सुट घालणारे विदेशात जाऊन कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणारे देशाला लाभलेले सर्वात बोगस पंतप्रधान आणि सरकार लाभलयं. या सरकारने सत्तेत आल्यापासून एवढी पाप करुन ठेवली की त्यांना देवही माफ करणार नाही. सर्वसामान्य जनतेची हळहळ या ढोंगी,दलाल,नाकर्त्यांना लागेल. बेरोजगार,शेतकरी,शेतमजुर,नोकरदार,छोटे व्यावसायीक त्रस्त असल्यामुळे या सर्वांचीच हळहळ लागेल. एवढी पाप या सरकारने करुन ठेवली आहे. सर्व घोटाळ्याची कल्पना असतांना सुध्दा पंतप्रधान,अर्थमंत्री यांनी आशीर्वाद देऊन पैसा बॅँकाना देण्यास प्रवृत्त केले. आणि नीरव पैसा घेऊन फरार झाला. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी,अर्थमंत्री अरुण जेटली हेच खरे गुन्हेगार आहेत.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments