Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमहाठगांना राजकीय वरदहस्त!

महाठगांना राजकीय वरदहस्त!

पल्या देशात घोटाळे करण्याची जणू स्पर्धा लागली की काय अशी शंका मनात उपस्थित होत आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा महाघोटाळा उजेडात आला तो म्हणजे हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी केलेला. तीन कंपन्या स्थापन करुन हा महाघोटाळा केला. पंजाब नॅशनल बँक देशातील दुसऱ्या क्रमांची बॅंक मानली जाते. महाठग हिरे व्यापाऱ्यांनी ११ हजार ५०० कोटी रुपयाचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नीरव आणि त्याचा मामा मेहुल हे साधेसुधे महाठग नसून त्यांचा देश विदेशात हिरे,ज्वेलरीचा मोठा व्यापार आहे. परंतु या महाघोटाळ्यात ते दोघेच नव्हे तर संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहेत. सरकारच्या इशाऱ्यावर हा महाघोटाळा झाला यात शंका घेण्यासाठी बरीच जागा आहे. नीरव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निकटवर्तीय मानला जातो. असा आरोप होत आहे. यापूर्वी ललित मोदी आणि भाजपाचे काय संबंध आहेत हे जगजाहीर आहे. विजय माल्या हे भाजपाचे राज्यसभेचे खासदार होते त्यांनीही मोठा घोटाळा करुन विदेशात पळ काढला. आणि हे सहज घडले आहे असा समज असेल तर तो महामुर्खपणा ठरेल. सर्व सामान्य व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी बँकामध्ये हेलपाटे मारावे लागतात. शंभर खेटे मारुनही कर्ज मिळत नाहीत. मग धनदांडग्यांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज सहजासहजी मिळतात याचाच अर्थ त्याला मोठे वरदहस्त लाभलेले असतात. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी तीन कंपन्या स्थापन केल्या. डायमंड आरएस, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंडस अशी त्याच्या हिरा कंपन्यांची नावं असून तीन कंपन्यांनी हाँगकाँगमधून माल आयात करण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवली. ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’च्या मदतीनं हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक, अॅक्सिस बँकेतून पैसे मिळवले. प्रत्यक्षात मात्र ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’साठी (एकप्रकारे खातेदाराच्या वतीनं पैसे चुकते करण्याची बँकेनं घेतलेली हमी) येथेच शंकेची पाल चुकचूकते. परंतु सर्व लुट झाल्यानंतर  पंजाब नॅशनल बँक १७ जानेवारीला सीबीआयकडे गुन्हा दाखल करून अपहाराच्या चौकशीची मागणी केली. २६ जानेवारीला झालेल्या २८० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा बँकेच्या तक्रारीत उल्लेख करण्यात आला. नीरव मोदी, त्याची पत्नी आमी मोदी, भाऊ निशल आणि मेहुल चोकसी यांच्यावर गुन्हा दाखला झाला. खरतर २०१० मध्ये तीन कंपन्यांसाठी प्रथम ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ देण्यात आलं, पण त्यासाठी पैसे घेतले नाही. आता २०१० पासून सुरू असलेल्या या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. खातेदाराला जेवढ्या रक्कमेची हमी हवी आहे तेवढी रक्कम खात्यात ठेवणं बंधणकारक असतं. पंजाब नॅशनल बँकेच्या अपहारात लेटर ऑफ पहिलं ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ मार्च २०१० मध्ये देण्यात आलं.  नीरव मोदी अपहार प्रकरण समोर आल्यानंतर त्यावेळचे बँकेचे उपव्यवस्थापक गोकूलनाथ शेट्टी आणि त्याचे सहकारी मनोज खरात यांनी ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ जारी करताना रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमांची सपशेल पायमल्ली केल्याचं उघड झालंय. नीरव मोदी यांच्या पळून जाण्याला कोण जबाबदार आहे? नीरव मोदींनी पूर्ण सिस्टमला कसा धोका दिला? चार वर्ष चौकशी एजन्सीनं काय केल? अर्थमंत्री आणि पंतप्रधान यावर गप्प आहेत. हे आरोपींना पाठिशी का घालत आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. घोटाळ्याची रक्कम ११ हजार कोटी नव्हे तर ३० हजार कोटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललित मोदी, विजय माल्या यांच्यानंतर आता नीरव मोदीने महाघोटाळा केला आहे. या घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक ऑफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते. महाठग फरार झाले त्यांच्याकडून ती रक्कम वसुल केली जाईल का? त्यांना विदेशातून अटक करुन भारतात आणले जाईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.  यामुळे खरच अशा मंडळींना सरकार पाठिशी घालून घोटाळे करण्यात सहकार्य करत असल्यामुळे असे महाघोटाळे होत आहेत. ते देशासाठी धोकादायक आहे. अस म्हटल तर ते वावगे ठरणार नाही.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments