Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखचोरांच्या उलट्या बोंबा!

चोरांच्या उलट्या बोंबा!

लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र भीमा कोरेगावच्या बंदला हिंसक वळण लागले. जनतेला वेढीस धरण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण न ठेवता बघ्याची भूमिका घेतली. नाकर्त्या सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात समाजा-समाजात जो काही उद्रेक होत आहे त्याला संपूर्णपणे सरकारच जबाबदार आहे. सरकार इंग्रजांसारखे ‘फोडा  आणि राज्य करा’ अशी भूमिका पार पाडत आहेत. खऱ्या अर्थाने हे सरकारच देशाचे दुश्मन आहे. हा प्रकार म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. भीमा कोरेगावच्या घटनेमागे मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर सरकारने गुन्हे दाखल केले परंतु त्यांना अटक झाली नाही. एकबोटे,भिडे सारख्या प्रवृत्तींनी जर भीमा कोरेगावमध्ये तरुणांचे माथी भडकविण्याचे काम केले असेल तर त्यांच्यावर सरकारने ताबडतोब कारवाई करायला हवी. भिडे,एकबोटे सारख्या प्रवृत्ती बैठका घेऊन जर माथी भडकविण्याचे काम करत असतील तर जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा. अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. सरकार याला गांभीर्याने घेणार नाही. कारण सरकारचे अदृश्य हात अशा प्रवृत्तींसोबत असून सरकारला तेढ निर्माण करुन पुढच्या निवडणूका जिंकायच्या आहेत. सरकारकडे विकासात्मक कोणतेही काम नाही. राज्याची,देशाची वाट लागलेली आहे. २०१९ च्या निवडणूका जिंकायच्या आहेत. सर्व जातीधर्मात तेढ निर्माण करुन सरकार इंग्रजांसारखे षडयंत्र रचत आहेत. निवडणूका पर्यंत दंगली उसळत राहतील त्यात काही नवल वाटायला नको. महाराष्ट्र बंदने राज्यातील अनेक भागात हिंसक वळण घेतले. मुंबईत सुद्धा काही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने झाली. वाहनांची तोडफोड,जाळपोळ करण्यात आली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या, स्टीलच्या खुर्च्या आणि टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले. या सर्व प्रकाराला आंदोलन नव्हे तर दहशत म्हटले जाते. सरकारी,तसेच खाजगी मालमत्तांचे नुकसान करणे हा सुध्दा गुन्हाच आहे. असे कृत्य करुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. मात्र मतांच्या लांगुलचालनासाठी सरकारने आंदोलनकर्त्यांना तोडफोड,जाळपोळ करण्याची मुभा दिली होती. असेच चित्र दिवसभर मुंबईसह राज्यात दिसून आले.करंट सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात,देशात एकही चांगली गोष्ट घडत नसून,अराजकता निर्माण झाली आहे. जनता दहशतीखाली जीवन जगत आहेत. प्रत्येक वर्ग नाकर्त्या सरकारच्या कामगिरीवर नाखूष आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. समाजा समाजामध्ये सरकारचे बगलबच्चे तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. यामुळे देशातील एकता अखंडतेला धोका निर्माण झाला. जनतेने वेळेवरच समजून घेतले नाही तर मोठे संकट कोसळू शकते.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments