Friday, April 26, 2024

सेनेचा दणका!

शिवसेना, भाजपा सत्तेत जरी एकत्र असले तरी ते दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक २८ मे रोजी होत आहेत. काँग्रेसच्या वतीनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना उमदेवारी देण्यात आली. भाजपाने येथे संग्रामसिंह देशमुख यांना उमदेवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वजीत कदम यांना आपला पांठिबा जाहीर केला. शिवसेनेनेही विश्वजीत कदम यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपाला दणका दिला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे पाठिंबा जाहीर करुन सांगितले की, पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती. भाजपाने जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष  संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देऊन एका प्रकारे काँग्रेसला आवाहन दिले. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता निश्चित झाले आहे. सहकार क्षेत्रात पतंगराव कदम यांची भूमिका महत्वाची मानली जात होती. त्यांचे योगदान हे मोठेच आहेच. याचा विचार करुन श्रध्दांजली म्हणून शिवसेनेने विश्वजीत कदम यांना पाठिंबा दिला. एकीकडे पालघरमध्ये भाजपाने काँग्रेसच्या माजी मंत्र्यांना भाजपात प्रवेश देऊन भाजपाची उमदेवारी दिली. शिवसेनेनेही तेथे भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली. पालघरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला भाजपाने पाठिंबा मागितला. पालघर आणि पलूस-कडेगाव या दोन्ही ठिकाणी खासदार वनगा, आमदार कदम यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहेत. जर भाजपाला वाटत होते सेना,काँग्रेसने भाजपाच्या उमदेवाराला पाठिंबा द्यायला पाहिजे. तीच श्रध्दांजली ठरेल तर पलूस कडेगाव मध्ये भाजपाने उमदेवार देऊन अडेलतट्टूपणा का केला. राजकारणात भावना,आपुलकी या सर्व गोष्टींना गौन मानले जाते. प्रत्येक पक्षाला सत्तेपुढे या गोष्टी तुच्छ वाटतात. शिवसेना, भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असूनही शिवसेनेने पालघरमध्ये आपला उमेदवार दिला. परंतु दिवंगत वनगा यांच्या मुलाला भाजपाने उमदेवारी दिली असती तर शिवसेनेने तेथे निवडणूक लढवली नसती. व काँग्रेसनेही आपला उमदेवार दिला नसता. परंतु भाजपाने एका प्रकारे आपल्याच दिवंगत खासदाराच्या कुटुंबियांवर एका प्रकारे अन्याय केल्यामुळे वनगा यांच्या कुटुंबियांना शिवसेनेत प्रवेश करावा लागला. भाजपाने काँग्रेसचा उमदेवार भाजपात घेऊन त्याला प्रवेश दिला. शिवसेनेने आपला उमदेवार दिल्यामुळे पालघर मध्ये बिनविरोध निवडणूक होण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेने एका प्रकारे पलूस कडेगाव येथे काँग्रेसच्या कदमांना पाठिंबा देऊन एका प्रकारे भाजपाला दणका दिला. शेवटी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रु नसतो. हे शिवसेनेच्या पाठिंब्याने दिसून आले.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments