Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसाक्षात तानाजी, बाजी, येसाजीच....

साक्षात तानाजी, बाजी, येसाजीच….

१९९० च्या आसपास श्रावणातील रायगडावरील अतिभयानक व मुसळधार पावसाळा. रायगडच्या पायथ्याचे रहिवासी गणेशराव कानकाटे हे आपली हरवलेली गाय दोन दिवस शोधत होते. पहाटे एक गाय रायगडावरील शिवछत्रपतींच्या मुर्तीच्या आसपास असते हे रायगडावरील देशमुख यांनी त्यांना सांगितले. त्यावेळी रज्जू मार्ग ( रोप वे ) नव्हता. पायरीमार्गाने चालतच वर जावे लागत. पण कोकणातील पाऊस एवढा प्रचंड की घराबाहेरही पडणे महामुश्किल.

गणेशराव एका पहाटे ४ वाजता उठून पोत्याची गोंची करुन व छत्री घेऊन रायगड चढू लागले. मुसळधार पावसामुळे हळूहळू ते दिडदोन तासात वर पोहचले. पाऊस इतका भयानक की काही फुटांवरचेही दिसत नव्हते. सकाळी ६ च्या दरम्यान ते गाय कुठे आहे का हे पहायला रायगडावर आले. काहीच दिसत नव्हते. धुके आणि अतितीव्र पाऊस यामुळे चालणेही मुश्किल होते.

होळीच्या माळावर जिथे शिवछत्रपतींची मुर्ती आहे तिथे अंदाजे ते आले. तिथं त्यांना कानावर विचित्र संस्कृत मंत्र ऐकू येउ लागले. पण गच्च धुक्यामुळे दिसत मात्र कोणीच नव्हतं. पावसाने नाही पण असल्या या प्रकाराने ते अतीशय घाबरले. धाडस करून जरा पुढे गेले तर त्यांना मुर्ती दिसली आणि त्याशेजारी त्या धो धो पावसात एक वृध्द गृहस्थ नुसत्या धोतरावर शिवरायांच्या मुर्तीकडे हात जोडून काही मंत्र म्हणताना त्यांना दिसला….

त्या पावसातही ते मंत्र स्पष्ट आणि काळजाचा ठाव घेणारे होते. त्या वृध्दाची ती ध्यानमग्न अवस्था पाहून ते साक्षात तानाजी, बाजी, येसाजी असावेत अशी त्यांना जाणीव झाली.

ते वृद्ध गृहस्थ होते…

‘गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी’

 

लेख- बळवंत दळवी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments