Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभाजपचे ‘मनसे’ इशारे!

भाजपचे ‘मनसे’ इशारे!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचा झेंडा, भूमिका बदलल्यानंतर भाजपाकडून इशारे देण्याचे काम सुरु आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मनसेला सोबत घेण्याच्या तयारी दिसत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीकता वाढू लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही आज राज ठाकरेंची बैठक घेतली. भाजपचे मनसेला इशारे देण्याचे काम सुरु आहेत. दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येतील का हाच खरा प्रश्न आहे.

लोकसभेला मनसेनं उमेदवार न देता भाजपच्या विरोधात जाहीरसभांमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभा गाजवल्या होत्या. सभांमधून भाजपच्या कामकाजाचे भावाडे काढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांना राजकीय क्षितीजावरून हद्दपार करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी राज ठाकरेंवर भाजपने जोरदार टीका केली होती. राज ठाकरे हे बारामतीचे पोपट असल्याचं टीकास्त्र सोडलं होतं. परंतु आता पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये गुटूर गुटूर सुरु आहे.  भाजपाचे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. तासभर चाललेल्या या चर्चेनंतर मनसे-भाजपा युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकाबाजूला तर, भाजपा-मनसे एकाबाजूला असे चित्र आहे. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी राजकीय मोट बांधण्यासाठी आणि शिवसेनेला मुंबईत धक्का देण्यासाठी मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपा नेते आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चा वाढू लागलेल्या दिसत आहेत. भाजपा आणि मनसेमध्ये अधिकृत आघाडी नसली तरी, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय जवळीक मात्र वाढत चालल्याचे बोलले जाते. राज ठाकरे यांनी धरलेली हिंदुत्वाची कास आणि मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा यातून राज ठाकरेंचा मनसे पक्ष भाजपाच्या मैत्रीकडे झुकत असल्याच्या चर्चा आहेत.

राजकारणात कधीही कुणीही कुणाचा शत्रू नसतो. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चिन्हे आहेत. मनसेनं आपली भूमिका बदलली तर आम्ही सोबत घेऊ शकतो अशी विधाने भाजपच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळे भाजपला मनसेची साथ हवी त्यासाठी ‘कृष्णकुंजवर’ भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मनसे आणि भाजप भविष्यात युती करुन निवडणूक लढतील. त्यासाठीच भाजपला मनसे इशारे सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments