Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख…बलात्कार थांबतील का?

…बलात्कार थांबतील का?

देशभरात बलात्कार नावाचा लागलेला रोग अत्यंत भयानक स्वरुपात पसरला. दररोज कुठ न कुठ बलात्काराच्या घटना घडत आहेत. चार महिण्याच्या चिमुरडीपासून तर ८० वर्षाच्या वृध्दांवरही अत्याचाराच्या घटना घडाल्या. १२ वर्षापर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. आपल्या देशात कायदे बरेच आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही. बलात्काराच्या घटना घडत आहेत. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही ते नराधाम तुरुंगात जीवन जगत आहेत. जम्मू काश्मीरमधील कठुआ नंतर विदेशातही संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारची नाचक्की झाली. तरी सुध्दा सरकारचे मंत्री,कार्यकर्ते बलात्कारावर भलतच बरळत आहेत. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार तर म्हणाले एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या घटना घडत राहतील. दोन दिवसापूर्वी एस.व्ही.शेखर यांनी पोस्ट टाकून विकृती आणि सत्तेच्या माजाचे चांगलेच उदाहरण दिले. शेखर यांनी महिला पत्रकारांबद्दल गलीच्छ विधान केले. भाजपाची मंडळी विरोधी पक्षात असतांना निर्भया इतर बलात्कारांबद्दल रस्तावर येत होते परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये आरोपींना वाचवण्यासाठी भाजपाचे दोन मंत्री रॅली काढतात. भाजपाचे भक्त तसेच हस्तक, रॅली काढतात व बलात्काऱ्यांचा समर्थन करतात. महिला पदाधिकाऱ्यांनी तर चकार शब्दही काढला नाही. साधा निषेधही व्यक्त केला नाही. एकीकडे बलात्काऱ्यांचा समर्थन करायचा आणि दुसरीकडे आम्ही कडक कायदे आणले म्हणून स्वत:च पाठ थोपटून घ्यायची असा खेळ भाजपाकडून सुरु आहे. बलात्कार प्रकरणातील लाखो खटले प्रलंबित आहेत. एकीकडे सरकार कडक कायदे बनवत आहेत ते स्वागतहार्य आहे. मात्र गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना वाचवण्यासाठी सरकारचे लोक रस्तावर येतात. आरोपींवर गुन्हेगारांवर फुल उधळतात. विविध चर्चेदरम्यान आरोपींची बाजू अशा प्रकारे घेतात जणू काही गुन्हेगारांनी देशासाठी बलिदान दिले. आरोपी खूप स्वच्छ प्रतिमेचे आहेत. असा प्रकार सध्या सुरु आहे. उत्तरप्रदेशच्या उणावा मध्ये अल्पवयीन तरुणीवर अत्याचार आणि तिच्या वडिलांचा खून प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीपसिंह सैंगर याला वाचवण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी येडी चोटीका जोर लावला होता. तक्रारीनंतरही त्याला अटक करण्यात आली नव्हती. मात्र ज्यावेळी सर्वस्तरातून दबाव वाढला त्यावेळी सैंगरला अटक करण्यात आली. सैंगर विरोधत एक वर्ष पीडित तरुणीची तक्रार घेण्यात आली नव्हती. आम्ही महिला,मुलींना न्याय देण्यासाठी खूप कडक कायदे बनवतो अशा प्रकारे दाखवण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. गेल्या चार वर्षात महिलांवरील अत्याचार, हत्या, खूनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली. चार न्यायधीशांनीच न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर देशात काय चाललयं हे वेगळ सांगण्याची गरज नाही. यामुळे कायदे कितीही कडक केले तरी त्याची अंमलबजावीण कशा प्रकारे होते यावर बरचं काही अवलंबून आहे. कायदे बनवून महिला, मुलींवरील अत्याचार कमी होतील का? याची कोणतीही शाश्वती नाही.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments