Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखरक्षकच जेंव्हा भक्षक बनतात

रक्षकच जेंव्हा भक्षक बनतात

‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय…’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु गेल्या काही वर्षांत पोलिसांना या ब्रीद वाक्याचा विसर पडलेला दिसतो. पोलिसांनी दादागिरी,गुंडगर्दी,करणाऱ्यांना वढणीवर तर आणलेच नाही. उलट गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. सांगली पोलिसांनी लूटमारप्रकरणी अनिकेत अशोक कोथळे या २६ वर्षीय तरुणाला सांगली पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांच्या ताब्यात असलेला कोथळे याला गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेत आणले. कोथळेला पंख्याला हुकाला उलटे टांगले. थर्डडिग्रीचा वापर करुन त्याला बेदम मारहाण केली. त्याचे डोके पाण्यात बुडवून ठेवले. प्रचंड मारहाण आणि डोके पाण्यात बुडविल्याने कोथळेचा डीबी रुममध्येच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्या पथकाने थर्डडिग्रीचा वापर करुन लॉकअपमध्ये अनिकेतला मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार अखेर उजेडात आला. हा खून पचविण्यासाठी कामटेंच्या पथकाने आरोपी पळून गेल्याचा बनाव रचला. अंबोली घाटात मृतदेह जाळून टाकला. मात्र पोलिसांचा हा राक्षसी पणासमोर आला. खाकीमध्ये फिरणाऱ्या सहा राक्षसांचा खरा चेहरा समोर आला. कोथळेच्या खूनाच्या आरोपामध्ये सहा राक्षसांना बेड्या ठोकण्यात आले. पोलिसांना मारण्याचा कोणताही अधिकार नसतांना २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर अशी पथकातील अटक करण्यात आलेले खाकीतील राक्षसांची नावे आहेत. ख्ररतर पोलिस दलात सर्वच अधिकारी,पोलिस बदमाश असतात असेही नाही. चांगले अधिकारी,पोलिस आजही कार्यरत आहेत यामुळे कायदा सुव्यवस्था काही प्रमाणात नियंत्रणात आहेत. कोथळेचे प्रकरणही बाहेर आले नसते. परंतु रात्री साडेबारा वाजता पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे आरोपींची कोठडी तपासणीसाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी हे दोन्ही आरोपी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विचारणा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिस कोठडीत मारहाणीच्या बऱ्याच घटना घडत असतात. पोलिस स्वत:च्या बचावासाठी बनावट कथा तयार करुन आरोपीने हल्ला केला आम्ही प्रतिहल्ला केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. किंवा आरोपीने फाशी घेतली. डोके भिंतीवर आदळून आत्महत्या केली असे कथाकथन तयार करतात. पोलिसांना एवढा माज का आला? यावर गृहखात्याचे नियंत्रण नाही का? खोट्या आरोपाखाली कारवाई करुन कोणते कर्तव्य बजवतात. बोकाळलेल्या गुन्हेगारीला आळा कधी बसेल हाच खरा प्रश्न आहे. मात्र कोथळे हत्या प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे एवढेच.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments