Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकुठ नेऊन ठेवली पत्रकारिता? (भाग एक)

कुठ नेऊन ठेवली पत्रकारिता? (भाग एक)

न्यायपालिका, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. परंतु प्रसारमाध्यमांचा बुरुज काही प्रमाणात ढासळला. पूर्वी ‘पत्रकारितेला शस्त्र’ म्हणून ओळखले जात होते परंतु तो शस्त्र भ्रष्टाचाराची किड लागल्याने काही प्रमाणात बोथट झाला. ‘हुजुरेगिरी व चाटूगिरी’ पत्रकारीतेने पत्रकारीतेच्या नावाला ‘कलंक’ लागला. काही प्रमाणात पत्रकारिता जिवंत आहे. सर्वच पत्रकार, माध्यम समुह बदमाश असतात असंही नाही. परंतु काही समुह हे नुसतेच शेटजी, नेत्यांच्या इशाऱ्यावर चालविली जातात. त्यांना पत्रकार म्हणायची लाज वाटते, कारण ते पत्रकारीता नव्हे तर ते दलाली करतात. त्याला बरेचं कंगोरे आहेत. माध्यम समूह चालवणे हा काही तमाशा नव्हे. त्याच्यात पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो. चांगले पत्रकार चांगली यंत्रणा उभारावी लागते. समाजात जे काही चांगल वाईट घडत त्यावर बारीक नजर ठेवून ते समाजापर्यंत पोहचवाव लागत. परंतु एवढ्यावरच काम चालत नाही. जाहीराती, पेपराचा खप, दर्जेदार बातम्या, प्रत्येक बीटमध्ये माणसं. प्रत्येक वाचक वर्गाला त्या पध्दतीने बातम्या, कर्मचाऱ्यांना चांगला पगार, सुट्या, मेडीकल खर्च, पीएफ, बोनस, सर्व सोयी सुविधा पुरवीणे, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम, कर्मचाऱ्यांना चांगल्या वाईट समयी साथ देणे या सर्व गोष्टी केल्यानंतर माध्यमसमूह बाजारात टिकतात. व पेपराचा खपही चांगला राहतो. फक्त दर वर्षी औपचारिकता म्हणून पत्रकार दिवस साजरा करुन ते भागत नाही. पायी फिरुन, सायकलवर फिरुन पत्रकारीता करायचे दिवस गेले आहेत. काळ बदलला. काळानुरुप नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे तसा बदलही झाला. मला २०११ ची एक गोष्ट आठवली, नुकतेच मी स्वतंत्र पत्रकारिता सुरु केली होती. त्या दिवसात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचा भ्रष्टाचार आमच्या वर्तमानपत्रात उघडकीस आणला. तो नेता घाबरून आमच्या कार्यालयात ब्रीफकेसमध्ये बरेच पैसे घेऊन आला आणि आमिष दाखवायला लागला. मी माझ्या अण्णांच्या कानावर हे प्रकरण घातले, तुम्हाला विश्वास बसणार नाही २४ तासाच्या आत आमच्या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. तेवढेच नव्हे तर त्यांनी मला गौतम बुद्धांची एक गोष्ट पण सांगितली आणि बोलले, आपण पैसे घेऊन लोकांपासून लपवू शकू पण स्वतःच्या मनाला आणि आत्म्याला फसवू शकणार नाही. त्या नंतरही असे बरेच प्रसंग आले पण कुठलाही नेता आम्हाला आमिष दाखवयाचे साहस करू शकला नाही. माझे अण्णा, आजी, बरेच माझे हितचिंतक जे मला जगण्याचे मूल्य शिकवतात. आज मी जे काही आहे बहुतेक ह्याचे श्रेय ह्या सर्वाना जाते. माझ्या सारखे पत्रकार बोटावर मोजण्याइतकेच असतील, पण समाजाला त्यांची गरज आहे. मी आणि माझे अण्णा बाबासाहेब किंवा टिळक होऊ शकलो नाही तरी त्यांचा अंश जपल्याचे समाधान बाळगून हा प्रवास करत राहू, आणि उद्याचा उष:काल हा आमचा असेल. पत्रकारितेमध्ये वेगळ्या लोकांना शोधण्याचे काम वाचकांनी सुरु केलेले आहे, एक दिवस ते आमच्या चळवळीत आमच्यासोबत असतील. आम्ही असेच सदमार्गावर चालत राहावे असं तुम्हाला वाटत असले तर फक्त तुम्हीच आम्हाला आधार आणि आशीर्वाद देऊ शकता. आज पत्रकारितेचे दोन भागात विभाजन झाले आहेत. एक दलाली करणारी पत्रकारिता तर दुसरी पत्रकारिता म्हणजे जे सत्य आहे ते सगळ्यांपर्यंत पोहचवणे. आज खरच वाईट वाटते. ज्यावेळी आपण आपलं अधिकार, स्वाभीमान, लेखनीच शस्त्र गहाण ठेवतो त्यावेळी ती गुलामगीरी होते. परंतु या गुलामगिरीतून मी स्वत:ला जपले म्हणून मी पत्रकार आहे. मला याचा अभिमान वाटतो. मी वयाच्या १८ व्या वर्षी पत्रकारितेचा पहिला धडा माझ्या आजी कडून शिकले. त्याचवेळी आजीने सांगितले होते कुणाला घाबरवण्यासाठी किंवा कुणासमोर हात पसरण्यासाठी पत्रकरिता करू नकोस. पत्रकारीता ही समाजाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या घडामोडी, अन्याय, अत्याचार, व प्रशासन, सरकारला वठणीवर आणण्याच काम करण्यासाठी दिनदुबळ्यांना, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखनीचा उपयोग झाल पाहिजे. त्यासाठी मी आज पत्रकारिता करत आहे. आणि मला यापासून समाधानही मिळत आहे. मी पत्रकार आहे पत्रकार म्हणूनच काम करेल. दलाली करणार नाही. कारण ती माझ्या रक्तात नाही. कुणाचे पाय चाटणार नाही. ज्या दिवशी वृत्तपत्र भिक्षा पात्र आणि संपादक दलाल होतो त्या दिवशी ते वृत्तपत्र वैश्यावृत्तीमधे जमा होतो. त्या बायका आपला देह गिरवी ठेवून पैसे कमावतात आणि दलाल पत्रकार आपले संस्कार, स्वाभिमान  आणि मर्यादा वेशीला लावून पैसे कमावतात किंवा कामे करून घेतात. जर माझ्यावर असा प्रसंग आला तर त्या दिवशी मी पत्रकारिता सोडून देईल. खरा पत्रकार तेव्हाच होता येईल ज्या दिवशी तुम्हाला निष्पक्ष, निडर, निर्भिड लिहीता येईल, बोलता येईल. ह्या पत्रकारितेत पैसे मिळणार नाही पण सन्मान मिळेल. तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याचे साहस कुणी करणार नाही. जर ते जमत नसेल तर, मंत्रालयात मंत्र्यांच्या उंबरठ्यावरचा कुत्रा बनून दलाली करा आणि पैसे कमवा. त्याच्यासाठी तुम्हाला पत्रकारिता करायची अजिबात गरज नाही. लोकांना तुमचा आदर वाटावा असं लिखाण असाव.

 

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments