Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभाजपाला उपरेच का?

भाजपाला उपरेच का?

पालघर लोकसभा निवडणूकीत भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकीत भाजपाला उमेदवार मिळाला नाही. काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावीत यांना भाजपात आजच प्रवेश देऊन लोकसभा पोटनिवडणूकीची उमेदवारी दिली. खरतर भाजपात ३५ वर्षापासून काम करणारे पालघर मध्ये कार्यकर्ते होते. परंतु उपऱ्यांना भाजपात संधी देऊन उमेदवारी देण्याची नामुष्की भाजपावर आली. भाजपा सत्तेत जरी असला तरी भाजपाचे निवडून आलेले अर्धेअधिक आमदार, खासदार हे इतर पक्षातून आलेले उपरे होते. तोच कित्ता गिरवत भाजपाने आज पालघर मध्ये काँग्रेसच्या गावीतांना भाजपात प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी दिली. पालघरची निवडणूकीत भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. तत्कालीन खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांचा चिरंजीव श्रीनिवास वनगाला भाजपाकडून उमेदवारी हवी होती. भाजपाचा वनगा यांच्या कुटुंबियातील व्यक्तीला उमदेवारी देण्यासाठी नकार होता. वनगा यांना भाजपाकडून कोणताही प्रतिसाद नसल्यामुळे त्यांनी मातोश्री गाठली आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवबंधन बाधूंन घेतले. शिवसेनेने श्रीनीवास वनगा यांना उमेदवारी जाहीर केली. व वनगा यांनी शिवसेनेकडून उमदेवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस,बहुजन विकास आघाडी हे दोन्ही पक्ष आपले उमदेवार देणार आहेत. पालघरमध्ये चौरंगी लढत होईल व निवडणूक सर्व पक्षासाठी प्रतिठेची होईल. शिवसेनेच असं वागण बरं नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तरी सुध्दा भाजपाचं वागणं चुकीचंच आहे. एकीकडे ज्या वनगांनी पक्षासाठी ३० वर्षापेक्षा जास्त पालघरात मेहनत घेतली. त्या वनगांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी जर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती तर त्यांच्याशी किमान चर्चा करायला हवी होती. भाजपाचे नेते एकीकडे काँग्रेसमुक्त भारत बनवायच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन उमेदवारी देतात. खरतर हा भाजपामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे. एकीकडे ही जागा भाजपकडेच राहिली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. म्हणून भाजप येथून निवडणूक लढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी विकासाच्या मुख्य धारेमध्ये येण्यासाठी पालघरचा विकास झाला पाहिजे म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला असं सांगितले. जर पालघरमध्ये आमदार,खासदार म्हणून गेल्या ३५ वर्षापासून काम करत होते तर काँग्रेसमधून उपरे घेऊन त्यांना उमदेवारी का देण्यात आली. उपऱ्यांना निवडूण आणल्यानंतर वनगा यांना ती श्रध्दांजली कशी काय ठरणार. शिवसेना, भाजपा हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत परंतु या दोन्ही पक्षांनी आपआपले उमदेवार उभे ठाकून मतदारांना मुर्ख बनवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची जरी असली तरी उपऱ्यांना संधी देऊन पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments