Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeसौंदर्यकेस जाड होण्यासाठी ‘हे’ उपाय करा

केस जाड होण्यासाठी ‘हे’ उपाय करा

आपले केस जाड, लांब आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येक स्त्रिची इच्छा असते. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केसांचा पोत खराब होतो आणि मग नेमके काय करावे हे कळत नाही. प्रदूषण, शाम्पूचा भडीमार आणि इतर अनेक गोष्टींमुळे केस पातळ होतात. शिवाय सध्या ताण हे केस गळण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. महिलांचे सौंदर्य तर त्यांच्या केसातच असते असे म्हटले जाते. केसांचा पोत सुधारावा आणि ते जाड व्हावेत यासाठी घरगुती उपाय केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. केसांच्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम तेल आणि शाम्पू गरजेचा असतो. त्याचप्रमाणे आहार आणि इतरही गोष्टी केसांचे आरोग्या चांगले राहण्यासाठी तितक्याच आवश्यक असतात. पाहूयात केस जाड व्हावेत यासाठी नेमके काय करावे.

भांग बदला..
आपल्यातील अनेक जण कायम एकच भांग ठेवतात. त्यामुळे केसांना त्याचप्रकारचे वळण लागते. त्यामुळे ठराविक काळानंतर केस गळतात आणि टक्कल दिसायला लागते. त्यामुळे ठराविक काळानंतर केसांचा भांग बदलावा. त्यामुळे टक्कल पडण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.

ब्लो ड्राय
ब्लो ड्राय केल्याने केस जाड आहेत असे वाटते. त्यामुळे केस जास्तच पातळ वाटत असतील तर ते तात्पुरते जाड दिसण्यासाठी ब्लो ड्राय हा चांगला पर्याय असू शकतो. एकदा शिकून घेतले की राऊंड ब्रशने ब्लो ड्राय केल्यास त्याचा फायदा होतो.

केस वाळवताना वरुन खाली वाळवा
केस चांगले ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे केसांच्या मूळाची काळजी घेणे. तसेच केस घनदाट व्हावेत यासाठी केस वाळवताना ते वरुन खालच्या दिशेने पुसावेत.

केसांना मसाज करणे
अनेकदा केस तेलकट असल्याने किंवा इतर काही कारणाने चपटे दिसतात. अशावेळी केसातून दर काही वेळाने हात फिरवल्यास ते घनदाट दिसतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments