पार्लरला का जातात!

- Advertisement -

मुंबई : कोणताही कार्यक्रम म्हटलं की महिलवर्ग ब्युटीपार्लरमध्ये गेल्या शिवाय राहत नाही. खरतर ब्युटीपार्लरचा खर्च हा खूप असतो परंतु नाईला म्हणून तो खर्च करावाही लागतो. परंतु महिलावर्गाचा ब्युटीपार्लरवरील खर्च कमी करायला असेल आणि साधे उपाय केले तर त्याचे चांगले परिणामही दिसतील. ब्युटी पार्लरला जाणं सोडून देतील.

ब्युटीपार्लरला जाऊनही काहीच उपयोग होत नाही. उलट यामुळे त्वचेचे नुकसान होते ते वेगळेच. मात्र हा उपाय केला तर तुम्ही नक्की सुंदर दिसाल. साधे-सोपे आणि स्वस्त उपाय येथे सांगावेसे वाटतात. अंमलबजावणी करणे अजिबात कठीण नाही. तेव्हा वाचा सुंदर चेहऱ्यासाठी खालील हे उपाय

सुंदर गोल्डन त्वचा

- Advertisement -

तुमचा रंग कसाही असो, अजिबात त्याबद्दल मनात काहीच विचार ठेऊ नका, सरळ पाच ते सहा चमचे दूध घ्या, त्यात लिंबू पिळा, अर्धातास ठेवा, आणि मग चेहऱ्याला लावा, आठवड्यातून एकदा करा.

पाहा तुमची त्वचा गोल्डन रंगाची होईल. अर्थात खूपच मोठा चमत्कार होईल अशी देखील अपेक्षा ठेवू नका, जो कोणता बदल होईल तो नैसर्गिक असेल, आणि निश्चित सुंदर असेल.

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी

तुळशीच्या पानांचा रसरात्री बनवा, आणि सकाळी धुवा, असे करत राहा, जोपर्यंत चेहऱ्यावरचे काळे डाग जात नाहीत. १५ दिवसात चेहऱ्यावरील सर्व काळे डाग गायब होतील, तुम्हाला नक्कीच असं वाटेल आता मेकअप करायची गरज नाही, आणि त्यामुळे पार्लरला जायचीही गरज नाही.

- Advertisement -