Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसलग दोन दिवस महाशिवरात्री आली,महादेवाची करा आराधना!

सलग दोन दिवस महाशिवरात्री आली,महादेवाची करा आराधना!

महाशिवरात्रीनिमित्त यावर्षी महासंयोग जुळून आल्याने १३ व १४ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार १३ फेब्रुवारीला म्हणजे आज प्रदोष व चतुर्दशीदेखील आहे त्यामुळे आजच्या दिवशी उपवास केल्याने अधिक लाभ होऊ शकतो. फाल्गुनातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. १३ फेब्रुवारी मंगळवार रात्री १० वाजून २२ मिनिटांनी चतुर्दशीची सुरूवात होऊन ती १४ फेब्रुवारी रात्री १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या काळात जर महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर हे गोष्टी नक्की करून बघा. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची पूजा किंवा उपवास केलात तर या गोष्टी साध्य करता येतील. त्यामुळे त्याची आराधना करताना या गोष्टींची घ्या काळजी…

  • लग्नासंबंधी अडचणींसाठी

लग्नकार्यासंबंधी अडचणी उद्भवत असतील तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर केसर आणि दुधाचा अभिषेक करावा. त्याची रितसर पुजा करावी. याने लवकर लग्नगाठी जुळतात असं मानलं जातं.

  • धनप्राप्ती

असं म्हणतात आपण जेवढं देत राहतो तेवढंच आपल्याकडे येत राहतं. म्हणजेच ज्याची ‘दानत’ असते त्यालाच ‘बरकत’ असते. म्हणून महाशिवरात्रीला धनप्राप्तीसाठी अनेक भक्त महादेवाची पुजा करतात. ध्यानधारणा किंवा उपासना करताना भुतदया म्हणून प्राण्यांना व पक्ष्यांना अन्नदान करावं. यातून त्या मुक्या जीवांचे आशिर्वाद आपल्याला मिळतात. तसंच आपल्याकडे संपन्नता, समृध्दता आणि भरभराट राहते.

  • अपत्यप्राप्ती

महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करून मनातील इच्छा सांगून गरिबाला, गरजूला किंवा मुक्या प्राण्यांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावं. भगवान शंकरांची उपासना वंशवाढीसाठी केल्यास त्याचं फळ मिळतं आणि घरात अपत्यप्राप्ती होते असं म्हणतात.

  • सुख आणि समृद्धीसाठी

महाशिवरात्रीला गाईला हिरवा चारा किंवा पेंड भरवल्यास तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. घरावर किंवा कुटुंबावर आलेल्या संकटांच निवारण होतं.

  • मन:शांतीसाठी

भगवान शंकराच्या उपासनेत ‘ओम नम: शिवाय’ या मंत्राचा जप करून शिवलिंगावर बेलपत्राने अभिषेक करावा. तसंच २१ बेलाच्या पानांवर चंदनाने ‘ओम नम: शिवाय’ लिहून ते शिवलिंगावर अर्पण करावेत.

  • कौटुंबिक सुखासाठी

महाशिवरात्रीच्यादिवशी गरिबांना अन्नदान करून महादेवाची उपासना करावी.  आपल्या घरातील किंवा कुटुंबातील कलह किंवा वाद कमी होऊन पारिवारीक सुख मिळते. तसंच ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार घरात शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्यावर जलाभिषेक करावा, यामुळे घरात संपत्तीची आवक होते आणि घरात लक्ष्मी टिकून राहते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments