चीनमध्ये मुस्लिमांना ‘हॉटेल बंदी’

- Advertisement -

पेइचिंग: चीनने मुस्लिमांविरोधात अत्यंत कठोर कायदे बनविले आहेत. संपूर्ण चीनमध्ये मुसलमानांना हॉटेलमध्ये राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या १८ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा चीन सरकारने केली आहे. मात्र प्रशासनाने १८ ऑक्टोबरची वाट न बघता सरकारी आदेशाच्या अंमलबजावणीस सुरूवात केली असून मुस्लिमांना हॉटेलमध्ये राहण्यास दिल्यामुळे एका हॉटेलला दंडही ठोठावण्यात आला आहे.

चीनच्या शिनजियांग प्रांतात मोठ्या प्रमाणावर उइगर मुस्लिम समाज राहत असून त्यांच्याविरोधात चीन सरकारने ही मोहीम उघडली आहे. देशात दहशतवाद आणि कट्टरपंथाला उत्तेजन देण्याचं काम उइगर मुसलमान करत असल्याचा आरोप चीन सरकारने केला आहे. त्यामुळेच त्यांनी ही कारवाई केली आहे. मुस्लिमांना राहण्यासाठी जागा दिल्यामुळे ‘सेव्हन डेज इन’ या हॉटेलला दंड भरावा लागणार आहे. त्यांना दंडापोटी १५ हजार युआन मोजावे लागणार आहेत, अशी माहिती शेनजेन हॉटेलने दिल्याचं ‘रेडिओ फ्री आशिया’ने म्हटलं आहे.

- Advertisement -

डाटाबेस शेअर करून हॉटेलमध्ये राहणाऱ्यांची पोलिसांना माहिती दिली जाणार आहे. एखाद्या व्यक्तीचा संशय आल्यास पोलीस त्याला हॉटेलच्या बाहेर जायला सांगू शकते, असं हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलंय. दरम्यान, मुसलमानांना हॉटेलमध्ये राहण्यास बंदी घालण्याचा हा निर्णय केवळ देशांतर्गत डोमॅस्टिक हॉटेलला लागू आहे की आंतरराष्ट्रीय हॉटेललाही लागू आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

- Advertisement -