२८ वर्षीय पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे शिजवुन खाल्ले

- Advertisement -

मेक्सिको- मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीने त्याच्या आधीच्या पत्नीचे तुकडे करून शिजवून खाल्ल्यांची धक्कादायक घटना घडली आहे. तसंच तिच्या शरीराच्या उरलेल्या अवशेषांना त्याने प्लास्टिकच्या बॅगेत लपवून ठेवलं. महिला अचानक गायब झाल्याने तिचे घरचे विचारात पडले होते. सोमवार (२२ जानेवारी) रोजी महिलेच्या नवऱ्याच्या घरातून २८ वर्षीय माग्दालेना अगिलार रोमेरोच्या मृतदेहाचे अवशेष स्टोववर ठेवलेल्या भांड्यात सापडले.

महिलेच्या शवाचे अवशेष पाहून तिच्या घरच्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. देशाच्या दक्षिण भागात ही घटना घडली आहे. डेली मेलने हे वृत्त दिलं आहे.  माग्दालेना सहपरिवारसह राहत होती. त्यांना दोन मुलंही होती. पोलिसांच्या मते, मृत महिलेचा पूर्व पती सीजर लोपेज आर्सिनीगी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आरोपीने प्लास्टिकच्या बॅगेत शवाचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये लपवून ठेवले. स्टेट सिक्युरिटीचे प्रवक्ते रॉबर्टो अल्वारेज यांच्या माहितीनुसार, मृतदेहाकडे पाहून त्यांला शिजवलं असल्याचं दिसतं आहे. रोमेरोला १३ जानेवारी रोजी जिवंत पाहिलं होतं. तेव्हा ती तिच्या घरी जात होती. दुपारी ती तिच्या आधीच्या पतीच्या घरी मुलांना आणायला गेली होती पण तेथून परतलीच नाही. दरम्यान, पोलीस आरोपीचा शोध घेत असून महिलेची हत्या का करण्यात आली, याबद्दलची माहिती समजलेली नाही.

- Advertisement -