नेपाळचे माजी पंतप्रधान प्रचंड यांच्या मुलाचे निधन

- Advertisement -

नेपाळ: नेपाळचे माजी पंतप्रधान आणि सीपीएन (माओवादी) पक्षाचे प्रमुख प्रचंड यांचा एकुलता एक मुलगा प्रकाश दहल यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. रूग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश यांना आज सकाळी थापाथली येथील नॉर्विक आंतरराष्ट्रीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले.

माओवादी पक्षातील नेत्याने याप्रकरणी दुजोरा दिला आहे. प्रकाश हे वडील हे प्रचंड यांचे सचिव आणि पक्षाचे केंद्रीय सदस्य होते. प्रकाश यांच्या मृत्यूची वार्ता समजताच प्रचंड हे काठमांडूकडे रवाना झाले आहेत. झापा येथे ते आगामी निवडणूक अभियानात सहभागी होण्यासाठी गेले होते. प्रांतिक आणि संसदीय निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दोन आठवडे आधीच प्रकाश यांचे निधन झाले. प्रकाश यांची पत्नी बीना दहल याही कंचनपूर जिल्ह्यातून संसद निवडणुकीसाठी उभ्या आहेत. प्रचंड यांचे ते एकुलते एक सुपूत्र होते. त्यांना तीन मुली आहेत.

- Advertisement -