Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदेशशिक्षिका-विद्यार्थिनीचे समलैंगिक संबंध!

शिक्षिका-विद्यार्थिनीचे समलैंगिक संबंध!

teacher, student, lesbian

रशिया : रशियात एका ४१ वर्षीय महिला शिक्षिकेचे तिच्याच वर्गातील अल्पवयीन मुलीसोबतचे नको त्या अवस्थेतील छायचित्र व्हायरल झाले. या छायचित्रात अल्पवयीन विद्यार्थिनी आणि त्या शिक्षिकेत समलैंगिक संबंध असल्याचा खुलासा झाला. शिक्षिका इरिना  ब्रागिमखालिमोव्हा हिच्या विरोधात अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.

छायाचित्रासह या दोघांतील मोबाईल चॅट सुद्धा समोर आले. या दोघींचे अफेअर सुरू झाले त्यावेळी विद्यार्थिनीचे वय १७ वर्षापेक्षा कमी होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया अकाउंटवरून त्या दोघींचे खासगी छायचित्र लीक झाले आहेत. त्यापैकी काही छायचित्र त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामध्ये त्या एकमेकींना किस करताना दिसून आले. त्यापैकीच एक छायचित्र अतिशय खासगी क्षणांचा आहे. त्याच छायाचित्रामध्ये दोघींचे समलैंगिक संबंध असल्याचा खुलासा झाला आहे. इरिना त्या विद्यार्थिनीची बायोलॉजीची शिक्षिका आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी आपल्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले. विशेष म्हणजे, शाळेतील स्टाफ सुद्धा या दोघींच्या समर्थनात आहेत.

रशियात मानला जातो गंभीर गुन्हा

रशियात शिक्षक विद्यार्थ्यांचे शारीरिक संबंध त्यातही समलैंगिक संबंध गंभीर गुन्हा मानले जातात. तसेच या प्रकरणात पोलिस चौकशी करत आहेत. मात्र शाळेतील या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंता पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments